Viral Video:एक तरुणीने पोलिसांसमोर धावत्या ट्रेनमध्येच लगावले ठुमके; पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही….. पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video:सोशल मीडियावर तरुण-तरुणींच्या ट्रेनमधील डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अनेक जण अतरंगी व्हिडीओ बनवतात. या व्हिडीओवर प्रचंड लाईक्स आणि व्ह्युव्ज मिळाल्यास आपण मोठी प्रसिद्धी मिळवली असा अनेकांचा समज आहे. अशात सध्या सोशल मीडियावर आणखी एका तरुणीचा ट्रेनमध्ये (Local Train) डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यामध्ये तरुणी थेट सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांसमोर नाचत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणी ट्रेनमध्ये दरवाजासमोर उभे असलेल्या पोलिसांच्या बाजूला नाचू लागते. त्यानंतर पोलिसांसमोर उभी राहून नाचू लागते. दिल्ली मेट्रोमधील अनेक विचित्र व्हिडीओ आजवर व्हायरल झालेत. त्यानुसार ट्रेनमध्ये अशा प्रकारचे व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाणार असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं होतं. त्यामुळे पोलिसांसमोर नाचणाऱ्या या मुलीवर देखील कारवाई होईल असं व्हिडीओ पाहताना सुरुवातीला वाटत आहे. मात्र तसं न होता वेगळंच काही घडतं.

तरुणीचा डान्स पाहून सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस देखील नाचू लागतात. @Vivekspeaks या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. व्हिडीओ पोस्ट होताच यावर लाखो व्ह्युव्ज आलेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फेक असल्याचं देखील म्हटलं जातंय. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ बनावट असल्याचं म्हटलंय.कोणतेही पोलीस आपल्या कर्तव्यावर असताना अशा पध्दतीने रेल्वेमध्ये रील व्हिडीओ बनवत नाहीत.

त्यामुळे हा स्क्रिप्टेड व्हिडीओ आहे, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीये. या व्हिडीओची सत्यता काय आहे? तरुणी खरोखर पोलिसांसोबत नाचत आहे की पोलिसांच्या पोषाखात दिसत असलेली व्यक्ती फेक आहे याबाबत खरी माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय आणि लोकांचं मनोरंजन करत आहे.

पहा व्हिडिओ

हे पण वाचा

टीम झुंजार