Viral Video: सोशल मीडियावरील रील्स हे तर कधीकधी चर्चेचा विषय ठरतात. रील्स बनवण्यासाठी इन्फ्लुएंसर कधी हद्द पार करतात. सोशल मीडियावर तुम्ही अनेक असे रील्स बघितले असतील जिथे मेट्रो स्थानक, बस किंवा ट्रेन व स्थानकात डान्स करताना किंवा विचित्रपणे हावभाव करताना दिसतात. लोकांना आकर्षित करण्याचा जरी हा फंडा असला तरी कायद्याच्या दृष्टीने ते चुकीचे आहे.
सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ बनवल्यामुळं नागरिकांना त्रास होताच. त्यामुळं अशा घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई RPF ने एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरवर कारवाई केली आहे. सीमा कन्नोजिया हिच्यावर कारवाई केली आहे.सीमा कन्नोजिया ही सोशल मीडिया स्टार आहे. अलीकडेच तिचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सवर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुनच RPF पोलिसांनी सीमा कन्नोजियावर रेल्वे स्थानक परिसरात डान्स करताना कारवाई केली आहे. त्यानंतर तिने एक व्हिडिओ बनवून तिच्या वागण्याबाबत माफीदेखील मागितली आहे. त्याचबरोबर लोकांना अपीलदेखील केलं आहे. रेल्वे स्थानकांवर रील्स बनवणे हा दंडनीय अपराध आहे, असंदेखील ती म्हणताना दिसत आहे.

दरम्यान, सीमाचे अनेक असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यात ती विचित्र डान्स करताना दिसत आहे.दरम्यान, RPF पोलिसांनी सीमा कन्नोजिया हिच्यावर कारवाई करत तिला एक व्हिडिओ बनवायला सांगितला आहे. सीमा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्टदेखील शेअर केली आहे. तसंच, प्लॅटफॉर्म किंवा स्थानकात रिल्स बनवू नका. यामुळं प्रवाशांना त्रास होऊ शकतो. अंधेरी आणि सीएमएमटी स्थानकात मी रील बनवलं होतं त्याबद्दल मी माफी मागते, असं सीमाने म्हटलं आहे.