दिल्ली :- देशात गुन्ह्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. असे असताना एखादा भाडेकरू ठेवणे खूपच जोखमीचे झाले आहे.कारण दररोज भाडेकरूने अथवा भाड्याच्या घऱात हत्येच्या घटना घडत वाढत चालल्या आहेत.अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका 31 वर्षीय भाडेकरूने त्याच्या 60 वर्षीय घऱ मालकीणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सध्या एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या घटनेत भाडेकरूने मालकीणीची हत्या का केली हे जाणून घेऊयात.दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील 31 वर्षीय आरोपी देवेंद्र हा कामाच्या शोधात अलीगढवरून दिल्ली आला होता. यावेळी तांब्याची तार पॅकिंग करण्याचा तो व्यवसाय करायचा. त्यानंतर कोविड महामारीत त्याचे खुप मोठं नुकसान झालं. व्यवसाय ठप्प झाला.साधारण 2 वर्ष त्याच्याकडे कोणताच रोजगार नव्हता. त्यामुळे वडिलांकडून पैसै मागवून तो कसाबसा राहत होता. या दरम्यान 2019 साली देवेंद्र 60 वर्षीय आशादेवी यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहायला आला.

यावेळी देवेंद्र आणि आशादेवी यांची चांगली मैत्री झाली. या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांच्या अनैतिक संबंधांना सुरुवात झाली. हे संबंध सुरू असतानाच दोघांमध्ये एका तिसऱ्याची एन्ट्री झाली. खरं तर आशा देवी यांच्या घरात एक भाडेकरू महिला राहायची. या महिलेसोबत देवेंद्रचे नातं सुरू झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 4 डिसेंबरला दोघांनी लग्नगाठ बांधली.या लग्नाची माहिती आशादेवी यांना मिळताच त्यांना खूप राग आला.
त्यांनी तत्काळ देवेंद्रला फोन करून घरी बोलावून घेतले. त्यानंतर 1O डिसेंबरला देवेंद्र आशादेवीच्या घरी पोहोचला. यावेळी आशादेवीने देवेंद्रच्या लग्नास विरोध दर्शवला. या विरोधामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादातून आशादेवीने देवेंद्रच्या कानाखालीच मारली. या घटनेमुळे रागावलेल्या देवेंद्रने आशादेवीच्या डोक्यात विट मारली. त्यानंतर तिचा जीव जाईपर्यंत तो डोक्यात वीट मारतच राहिला. त्यानंतर देवेंद्रने तिचा गळा घोटण्याचा देखील प्रयत्न केला.
या हत्येनंतर देवेंद्रने आशादेवीचा मृतदेह तिच्या बेडरूममधील पलंगात लपवून ठेवला होता. यानंतर देवेंद्रने आशादेवीच्या घरातील 13 हजार रूपये रोख रक्कम आणि दागदागिने घेऊन तो पसार झाला. स्थानिकांना आशादेवीच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात आता पोलिसांना आरोपी देवेद्रला उत्तरप्रदेशच्या अलिगढमधून अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






