Viral Video : बसमध्ये सुटया पैशांच्या वादातून महिला वाहक आणि प्रवाशाची फ्री स्टाईल; जोरदार राडा पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video : खोपोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. खोपोली नगर परिषदेच्या बसमध्ये महिला वाहक आणि एका महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सुटया पैशांच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. शेवटी प्रवाशांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटवण्यात आला.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, खोपोली नगर परिषदेच्या बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुट्या पैशांच्या वादातून प्रवासी महिला आणि महिला वाहक यांच्यामध्ये तुफान राडा झाला. या महिलेनं तिकीट काढलं, मात्र वाहक महिलेकडे तिकीटाचे उर्वरित पैसे देण्यासाठी सुटे नव्हते, यावरून सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर भांडण सुरू झालं. या दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली, शेवटी प्रवाशांनी मध्यस्थी करत हा राडा सोडवला.

पहा व्हिडिओ

हे पण वाचा

टीम झुंजार