पाल ता रावेर वार्ताहर :- दिनांक 22/12/023- अखील भारतीय चैतन्य साधक परिवाराचे सर्वेसर्वा सद्गुरु परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी याच्या ब्रम्हलीन समाधी ला १४ वर्ष पूर्ण झाल्यामुळे दी २५ डिसेम्बर रोजी १४ व्या पुण्यतिथि महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे.त्याच बरोबर पाल वृन्दावन धाम आश्रमात स्थित भव्य श्री हरिधाम मंदिराचे वर्धापन दिवस साजरा करण्यात येत असून यासाठी आश्रमात तयारीला सुरवात करण्यात आलेली असून
या महोत्सवाला देशभरातील हजारो चैतन्य साधक परिवार तसेच संत महंत महामंडलेश्वर यांचे आगमन होणार असून दी २४ डिसेम्बर रोजी रात्री ८ ते १० या वेळेत सत्संग,दीपोत्सव, व भजन संध्या तसेच सकाळी २५ डिसेम्बर रोजी ६ वाजेपासुन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजी यांचे समाधी मंदिरात चरण पादुका पूजन, व अभिषेक करण्यात येणार असून ७ वाजेपासुन ध्यान प्रार्थना,व १० वाजे पासून सत्संग श्रद्धावचन व पूज्य बापूजी यांना भावपूर्ण आदरांजलि देऊन महाआरती नंतर महाप्रसाद वितरण करण्यात येणार असून येणाऱ्या साधक भक्ता साठी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, समाधि दर्शन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, सत्संग पांडाल व्यवस्था, जल व्यवस्था, अश्या विविध व्यवस्था साठी आश्रमातील ब्रम्हचारि व चैतन्य साधक परिवारतर्फे प्रयत्न सुरु असून
या महोत्सवास उपस्थित प्रमुख संत महंत तसेच महामंडलेश्वर यांचे श्रद्धावचन आणि पाल आश्रमाचे वर्तमान पदस्थ व महाराष्ट्र संत समिति चे प्रदेश अध्यक्ष श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज याचे सत्संग अमृताच्या लाभ भाविक भक्तानां मिळणार असून या महोत्सवाला पोलिस , आरोग्य,पाल ग्रामपंचायत,या प्रशासना कडून सेवा मिळावी तसेच या महोत्सवाला आपन सर्व आमंत्रित असल्याचे आव्हाहन आयोजक चैतन्य साधक परिवारातर्फे करण्यात येत आहे.
हे पण वाचा
- Viral Video:बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहात;अन् भररस्त्यात केली दोघांची धो धो धुलाई पहा व्हिडिओ.
- ‘तो तिच्यावर करत होता जीवापाड प्रेम’ पण ‘ती’…… आयुर्वेदिक औषधात विष मिसळून प्रियकराची केली हत्या; प्रेयसीला कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
- चोपडा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यावर हल्ला; अवैध वृक्षतोड प्रकरणात मोठी कारवाई.
- “तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील; आव्हाणे येथे भव्य नागरी सत्कार संपन्न.
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.