कासोदा-आडगाव जिल्हा परिषद गटात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन.
एरंडोल :- मतदार संघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयास पाठींबा देवून त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले. कासोदा आडगाव जिल्हापरिषद मतदार संघातील चौदा गावात सुमारे ८८ कोटी रुपये निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन प्रसंगी कासोदा येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास कासोदा येथे भव्य शिवस्मारक उभारण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी उत्राण येथील आनंदा धनगर यांचेसह विविध पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा आमदार चिमणराव पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.कासोदा अडगाव गटातील धारागीर,पळासदड, भालगाव,पातरखेडा,जळू नांदखुर्द बुद्रुक आणि खुर्द,हनुमंतखेडे बुद्रुक आणि मजरे, सोनबर्डी,बांभोरी, वनकोठे,उमरे,फरकांडे,मालखेडा,आडगाव आणि कासोदा येथे विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच पूर्ण झालेल्या कामांचे उदघाटन आमदार चिमणराव पाटील,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचेसह उपस्थित असलेल्या स्थानिक पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले.
पहा व्हिडिओ भाग १
सकाळपासून सुरु असलेल्या कार्यक्रमांचा रात्री कासोदा येथे जाहीरसभा घेवून समारोप करण्यात आला.प्रत्येक गावात आमदार चिमणराव पाटील व उपस्थित पदाधिका-यांचे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले.महिलांनी आमदार पाटील यांचेसह जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील आणि मान्यवरांचे औक्षण केले.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मतदारसंघात विकासाची गंगा वेगाने सुरु असल्याचे सांगितले. राज्यात सत्तेवर असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दबावाचे राजकारण करून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात होता.
पहा व्हिडिओ भाग २
त्यामुळे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये असंतोष निर्माण झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये असलेला असंतोष लक्षात घेवून वेगळा निर्णय घेण्याची भूमिका घेतली त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.मतदारसंघात सुरु
असलेली विकासकामे पाहून मानसिक आनंद मिळत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसोबत जाण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.मतदारसंघात
सुरु असलेल्या विकासकामांमुळे हतबल झालेले विरोधक अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पहा व्हिडिओ जाहीर सभा भाग ३
चार वर्षाच्या काळात मतदारसंघातील सर्व गावांना आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.कासोदा येथे ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध
करून दिल्या भव्य शिवस्मारक उभारण्यात येईल असे आश्वासन दिले.मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील,शिवसेनेचे
जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत),विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे,बाजार समितीचे माजी सभापती, शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,धारागीर येथील युवानेतृत्व नरेंद्रसिंग पाटील,
जिल्हा दुध संघाचे संचालक दगडू चौधरी,माजी सभापती अनिल महाजन, तालुका संघटक संभाजी पाटील, युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील,शहरप्रमुख कृष्णा ओतारी,मयूर महाजन, माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे योगेश देसले,बाजार समितीचे संचालक किरण पाटील, गजानन पाटील,डॉ.सतीश देवकर,आडगावचे उपसरपंच दिलीप पवार,कासोद्याचे सरपंच बंटी चौधरी,माजी सरपंच महेश पांडे यांचेसह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी,शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






