अडावद : शेतातील टूबेलसाठी थ्री फेज वीज कनेक्शन जोडण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना महावितरण कंपनीच्या वायरमनला लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. यामुळे महावितरणच्या गोटात खळबळ उडाली. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार हे चोपडा तालुक्यातील शेतकरी असून त्यांच्या पत्नीचे नावे असलेल्या दोनगाव शिवारात शेत आहे.
शेतकऱ्याने शेतातील टूबेलसाठी थ्री फेज वीज कनेक्शनसाठी महावितरणकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता.दरम्यान वीज कनेक्शन जोडण्यासाठी वायरमन अनिल शंकर राठोड (वय-२८ रा. लक्ष्मी नगर धानोरा ता चोपडा) यांनी ४ हजाराची मागणी केली, दरम्यान तक्रारदार शेतकरी यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार आज सापळा रचला तडजोडीअंती वायरमन याने ३ हजार स्वीकारत असताना पथकाने रंगेहात पकडले आहे.
यांनी केली कारवाई
सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री.सुहास देशमुख,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. सापळा व तपास अधिकारी: एन.एन. जाधव,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
सापळा पथक: पो.ना. बाळू मराठे,पो कॉ अमोल सुर्यवंशी , पोकॉ सचिन चाटे
कारवाई मदत पथक: अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक,सफो दिनेशसिंग पाटील स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाणे,पो. कॉ.प्रणेश ठाकुर
मार्गदर्शक:1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , 2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक 3) श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.