पुणे : बहिणीला त्रास देत असल्याने १९ वर्षीय तरुणाने आणि त्याच्या मित्राने दाजीचा खून केल्याची घटना बालेवाडी येथील पाटील वस्तीत घडली. खूनानंतर आरोपी पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.राजेंद्र कुमार कांबळे (वय २४, रा. बालेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात बाब्या व राहुल रिकामे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका १८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हा बिगारी काम करत होता. काही महिन्यांपुर्वीच तो पुण्यात आला होता. बालेवाडी येथील पाटील वस्तीत तो भाड्याच्या खोलीत राहत होता. दरम्यान, तो पत्नीला त्रास देत होता.
तिला मारहाण करत होता. त्याचा राग पत्नीचा भाऊ बाब्या याला आला होता. दरम्यान, बुधवारी रात्री वाद झाल्यानंतर दोघांनी राजेंद्र याचा खून केला. गुरूवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे पण वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






