Viral Video: सध्या सर्व ठिकाणी लग्नसमारंभाचा हंगाम असल्याचे आपल्याला दिसत आहे. अनेक लग्नातील धमाल मज्जा मस्तीचे रील सोशल मीडियावर खूप व्हायरल होऊ लागले आहेत. कधी नवरी मुलगी डान्स करत स्टेजवर येते तर कधी नवरा मुलगा डान्स करत नवरीला स्टेजवर आणतो.असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आज असाच एका लग्न सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नवर देवाच्या वागणुकीवर नेटकरी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, नवरदेव आणि नवरीमुलगी स्टेजवर उभे आहेत. नवरदेवाच्या हातात फुलांची माळ आहे. त्यांच्या आजूबाजूला स्टेजवर अनेक वऱ्हाडी मंडळी आहेत. अशातच नवरदेव नवरीच्या कानात काही तरी सांगत असतो, त्यावर नवरी नाही बोलते. तिने नाही बोल्यावर तो नवरीच्या गळ्यात हार घालत नाही. अशात नवरदेव पटकन असे काही करते ज्यामुळे नववधू लाजू लागते.
वर वधूच्या जवळ जातो आणि तो तिच्या गालावर चुंबन घेतो. हे पाहून मंडपातील सर्व लोकांना हसू येतं.व्हायरल व्हिडिओ @ChapraZila या एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. नक्की हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकले नाही. व्हिडिओ व्हायरल होताच काही नेटकऱ्यांच्या भन्नाट तर काही नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘अगदी लग्नासारख्या गोष्टींचीही चेष्टा करण्यात आली आहे’. तर आणखी एका यूजरने लिहिलंय की,’काय वेडेपणा’.व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला असून विविध सोशल मीडियावर शेअरही करण्यात येत आहे.
हे पण वाचा
- शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा…आ.अमोलदादा पाटील
- एका वयस्कर व्यक्तीस अंघोळ करताना नग्नावस्थेतील तरुणीच्या व्हिडीओ कॉल आला मग….. ब्लॅकमेलिंग करून 14 लाख 66 हजार उकळले,काय आहे प्रकरण वाचा.
- गुगलच्या मदतीने बनविलेले विषारी फुलांचे ज्यूस पाजून सैतान मुख्याध्यापिका पत्नीनं शिक्षक पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह पण……
- ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कमेची घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मेहूणबारे पोलिसांनी केले जेरबंद.
- सासूने घेतला चोरीचा आरोप कंटाळून महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात मारली उडी वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला.