स्वतःच्या घरातच अनेक वेळा झाला अत्याचार.आई वडिलांसह सहा आरोपींना अटक,एक आरोपी फरार.
भंडारा:- साकोली तालुक्यात १२ वीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन पोटच्या मुलीला आई वडिलांनी पैशासाठी देहव्यापारात ढकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेवर विविध व्यक्तींकडून अनेक ठिकाणी सामूहिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला. पीडितेच्या काकूने साकोली पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन यातील सहा आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी साकोलीत एका महाविद्यालयात १२ वीत शिकत होती. गावावरून दररोज येण्याजाण्यासाठी त्रास होत असल्याने ती साकोलीत काकाकडे राहून शिक्षण घेत होती. मात्र कालांतराने पीडितेच्या वडिलांनी तिला गावाला नेले. अनेक दिवसांपासून पीडितेसोबत बोलणे झाले नसल्याने काकाने १४ डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबीयांची चौकशी केली. यावेळी पीडितेने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आणि तिचे आरोग्य बिघडल्याचे कथन केले.
याप्रकरणी काकूने पुढाकार घेत पीडितेला साकोली पोलीस ठाण्यात नेत तक्रार नोंदवली. पैशासाठी पोटच्या मुलीला आई वडिलांनीच ओळखीतल्या काही व्यक्तीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी व मारहाण केली. हा प्रकार सतत वाढत गेला. महिन्याभरामध्ये तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरीत्या अत्याचार करण्यात आले. कधी पीडितेवर गावातील घरीच आई-वडिलांचे समक्ष तर कधी साकोलीत, तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडितेवर मारहाण करीत अत्याचार करण्यात आले.
या प्रकरणाची तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी तडकाफडकी पीडितेच्या आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली. यातील एक आरोपी फरार आहे. आरोपींवर भादंवि ३७६ (१), (२), एन,जे, ३७६ ड, ३७०, ३४, पोस्को (४),(६) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.साकोली तालुक्यातील एका गावी १७ वर्ष ७ महिने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी सहा आरोपींना अटक झाली असून एक फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. या घटनेत पीडितेच्या आईवडिलांचा सहभाग असून त्यांना अटक करीत भंडारा कारागृहात रवानगी केली.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५