आग्रा :- अगदी साधेपणानं एका मंदिरात लग्न लागलं… वरात घरी आली… घरात सर्व जण आनंदात होते… नववधूसोबत संसार थाटण्यासाठी नवरदेव उत्सुक होता… सुहागरातची वेळ जवळ आली…पण लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूने नवरदेवासोबत असा कांड केला की नवरदेवासह संपूर्ण कुटुंब हादरलं. उत्तर प्रदेशमधील लग्नाची ही स्टोरी आहे.आग्रा येथील नागला रामबल येथील रहिवासी अनिल कुमार लग्नासाठी मुलगी शोधत होता. त्याने त्याच्या ओळखीतील राजेशकुमार दोहराला
याबाबत सांगितलं. राजेशनं त्याची ओळख हातरस येथील सासनीतल्या सुनीलशी करून दिली आणि मग सुनीलने प्रदीप नावाच्या व्यक्तीशी. प्रदीपने अनिलला एक मुलगी दाखवली. रजनी असं तिचं नाव. रजनीनं सांगितलं की ती गरीब कुटुंबातील आहे. अशा परिस्थितीत वराला दोन्ही बाजूंचा खर्च उचलावा लागणार आहे. यासाठी अनिल तयार झाला. त्याने रजनीला लग्नखर्चासाठी 70 हजार रुपये दिले.18 डिसेंबर रोजी एका मंदिरात अनिल आणि रजनीचा विवाह झाला. अनिल रजनीला घेऊन घरी आला.
लग्नाच्या पहिल्याच रात्री रजनी आजारी पडली. औषध हवं म्हणून ती पतीला घेऊन घराबाहेर पडली.दोघंही हातरस रोडवर गेले. तिथं ज्यानं अनिल आणि रजनीचं लग्न जमवलं तो प्रदीप आधीपासूनच होता. रजनीनं काहीतरी बहाणा करून अनिलला सोडून प्रदीपसोबत पळ काढला. वराने येऊन हा प्रकार घरच्यांना सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर वर आणि त्याच्या कुटुंबानं तात्काळ ट्रान्सयामुना पोलिसात याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वधूला अटक केली. वधूवर फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तिनं फसवणुकीसाठीच लग्न केलं होतं. वधूने सांगितलं की, ती मूळची कटघर, मुरादाबादची आहे. तिनं केवळ पैशांसाठी लग्न केलं होतं, तिचा हिस्सा नवरदेवाने दिलेल्या 70 हजार रुपयांमध्ये होता.मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा पत्ता बरोबर नसल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. अशा परिस्थितीत त्याच्या पत्त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. नाहीतर ती पुन्हा कोणाची तरी फसवणूक करेल. सध्या तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. आता नवरीला पकडल्यानंतर तिच्या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे.
हे पण वाचा
- महावितरणकडून धडक मोहीम,विज बिल कमी यामुळे मीटर चेकिंग मोहीम,७७ वीज ग्राहकांचे मीटर घेतले तपासणीसाठी ताब्यात.
- कांताई धरणाच्या पाण्यातून यंत्राच्या साह्याने भरमसाठ अवैध वाळू उपसा ; ऊपाय योजना करा मागणी.
- आजचे राशी भविष्य सोमवार दि.२० जानेवारी २०२५
- एरंडोल बस आगारातर्फे इंधन बचत या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन.
- लग्नानंतर अवघ्या एकाच महिन्यात त्यांच्या संसाराला लागली दृष्ट; पतीचा मृत्यू नंतर विरह सहन न झाल्याने तिसऱ्याच दिवशी पत्नीने संपविले जीवन.