Viral Video:भरमंडपातच नवरी-नवरदेव एकमेकांशी भिडले; वराती झालेआश्चर्यचकीत पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: भारतात सध्या लग्नाचा सीजन सुरू आहे. दररोज हजारो लग्ने होत आहेत. या लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. आता असाच एका लग्नातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये नवरी नवरदेव एकमेकांशी वाद घालत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणार नाही.या व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहे की, नवरदेव स्टेजवर उभा आहे आणि तो नवरीला हार घालण्याची वाट पाहत आहे.

काही वेळाने नवरी तिथे येते आणि स्टेजसमोर उभी राहते. त्यानंतर स्टेजवर उभा असलेला नवरदेव तिला वर येण्याचा इशारा करतो. नवरी वर येत नाही, तेव्हा नवरदेव स्वतः खाली उतरून तिच्या जवळ जातो. तो तिचा हात धरतो आणि तिला वर खेचतो.त्यानंतर घडते असे की, नवरीने स्टेजवर जाण्याऐवजी नवरदेवाला खाली खेचते. तेव्हा नवरदेव रागवतो, व सगळे हसायला लागतात.

हे दृष्य पाहून असे वाटते की जणू दोघेही कुस्ती खेळत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल.हा व्हिडिओ ashiq.billota या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अल्पावधीत लाखो लोकांपर्यंत पोहोचला आहे. यावर नेटकरी मजेशीर कमेंट करत आहेत. स्वत:च्या लग्नात असे वागणे चुकीचे आहे असे एका युजरने म्हटले आहे.

पहा व्हिडिओ

https://www.instagram.com/reel/C1JTsEFPbec/?igsh=M3RwYmptbTR3c2dq

हे पण वाचा

टीम झुंजार