आत्महत्या केलेल्या लहान भावाच्या पत्नीला मोठ्या जेठने जिवंत जाळलं; कारण ऐकून मन सुन्न होईल.

Spread the love

रतलाम :- मध्य प्रदेश राज्यातील रतलाममधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. त्यामध्ये मोठ्या दिरानं आपल्या लहान भावाच्या पत्नीला जिवंत जाळलं आहे. मृत महिलेचे नाव निर्मला आहे. ती आपल्या दोन मुलांसह सासरी रहात होती.तिच्या पतीने सहा महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. त्याचे नाव प्रकाश होते.

सांगितले जात आहे की, यामुळे नाराज झालेला मोठा दीर सुरेश याने निर्मलाची हत्या केली. सुरेश आपल्या लहान भावाच्या आत्मत्येसाठी निर्मलाला जबाबदार धरत होता. शनिवारी या मुद्द्यावरून घरात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सुरेशने निर्मलाला मारहाण केली. त्यानंतर ओढत घराबाहेर काढले व पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले. या घटनेत पीडिता गंभीररित्या भाजली गेली व घटनास्थलीत तिचा मृत्यू झाला. आरोपी सुरेशने निर्मलाला जिवंत जाळून तिची हत्या केली व तिच्या भावाला फोन करून याची माहितीही दिली.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार निर्मलाच्या भावाने सांगितले की, आम्हाला सुरेशचा फोन आला होता. त्याने सांगितले की, तुमच्या बहिणीला जिवंत जाळले आहे. तिच्या पतीच्या मृत्यूसाठी ते माझ्या बहिणीला जबाबदार धरत होता. तो गेल्या अनेक दिवसांपासून बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत होते. निर्मलाच्या भावाने सांगितले की, आजच मी तिला माहेरी आणण्यासाठी जाणार होतो. इतक्यात त्यांचा फोन आला व सांगितले की, तिला ठार मारले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार