Viral Video: सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. दररोज सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट अन् तितकेच चक्रावून टाकणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तरुणाने एकाच मंडपात चक्क चार तरुणींशी विवाह केलायं. हा सगळा प्रकार पाहून नेटकरीही चांगलेच हैराण झालेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंडपामध्ये लग्नाची धामधुम सुरू आहे. एक तरुण त्याच्या होणाऱ्या चार पत्नीसोंबत सात फेरे घेत आहे. लग्न मंडपात जमलेल्या लोकांचाही मोठा उत्साह दिसतोय. हा सगळा प्रकार पाहून नेटकरीही थक्क झालेत. काही जणांनी भावाचं नशिबचं जोरात आहे.. अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्यात.

तर काही नेटकऱ्यांनी एवढ्यांना कसं सांभाळणार हा बाबा? असा मनातला प्रश्नही विचारला आहे. थोडक्यात या तरुणाच्या प्रतापाने नेटकरीही चक्रावून गेलेत. हा व्हिडीओ @musafir_vj या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 61 हजारांपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे.