एरंडोल :- खर्ची बुद्रुक (ता.एरंडोल) येथील तसेच परिसरातील शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार चिमणराव पाटील आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत(शिंदे गट) प्रवेश केला.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व पदाधिका-यांचे स्वागत केले.यापूर्वी अनेक सरपंच आणि पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी काळात होणा-यास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची चर्चा राजकीयवर्तुळात सुरु आहे.
विखरण-रिंगणगाव गटात मागील महिन्यात शासनाच्या विविध योजनांच्यामाध्यमातून सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व पूर्णझालेल्या कामांचे उदघाटन आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते आणि जिल्हाबँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील व प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. आमदार चिमणराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यापदाधिका-यांनी संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने नियोजन केले असूनतालुक्यातील अनेक पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

गटात सुरुअसलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन शिंदे गटात प्रवेश केल्याचेपदाधिका-यांनी सांगितले. यावेळी सुरेश मोपारी यांची रिंगणगाव गण प्रमुखम्हणून नियुक्ती करण्यात आली.यावेळी सुरेश मापारी यांचेसह नथ्थूमराठे,गोपाल वाघे,अनिल मराठे,सचिन चतुर,सागर सोन्ने,भागवत मोपारी,भूषणम्हस्के,अतुल सोन्ने,नाना उदार,नाना नागदे,नंदू मराठे,समाधानमोपारी,गोपाल मोपारी,सोपान चतुर,राजू मराठे,गोपाल चव्हाण, चेतन चव्हाण,पंढरीनाथ चव्हाण,विजय ठेरे,बापू गरुमे यांचेसह परिसरातीलकार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्व पदाधिका-यांचे जिल्हा बँकेचेउपाध्यक्ष अमोल पाटील यांनी स्वागत केले.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तसेच आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विखरण-रिंगणगाव सुमारे ५० कोटी आणि कासोदा-आडगाव गटात सुमारे ८२ कोटीरुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले असून आगामीकाळात तळई- उत्राण गटात देखील करोडो रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यातयेणार असल्याची माहिती उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.मतदारसंघात सुरुअसलेल्या विकासकामांमुळे पदाधिका-यांसह मतदारांमध्ये देखील समाधान व्यक्तकेले जात असून आगामी काळात अनेक प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणारअसल्याचे त्यांनी सांगितले.फोटो ओळी-एरंडोल येथे पदाधिका-यास नियुक्तीपत्र देतांना जिल्हा बँकेचेउपाध्यक्ष अमोल पाटील व शिवसेनेत प्रवेश करणारे पदाधिकारी.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.