परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजी यांच्या पुण्यतिथि निमित्त देधभरातून हजारो साधकांचे आगमन

Spread the love

पाल ता रावेर वार्ताहर:- दिनांक 25/12/2023रोजी संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजी यांच्या १४ व्या पुण्यतिथि महोत्सवानिमित्त देशभरातून १५ ते २० भाविकांनी श्री वृन्दावन धाम पाल आश्रमात समाधि दर्शन घेतले तसेच शेकडो संत महंताच्या सनिध्यात श्रद्धावचन व पाल आश्रमाचे विद्यमान पदस्थ आणि संत समिति चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सत्संग अमृताच्या लाभ घेतला. श्रद्धावचन करताना डोंगरर्दे हुन स्वामी स्वरूपानंद जी महाराज यानी परम पूज्य बापूजी आमच्या संग सत्संग रूपाने सोबतिला आहे .मी कुठल्याही मानसिक दुखांत अडकलो तर पूज्य बापूजी यांचे सत्संग श्रवण केल्याने समाधान वाटते.

त्यानतर सतवाडा हुन श्री संत दास जी महाराज यानी पुज्य बापुजी यांनी जे भक्ति व मानवी जीवनाच्या कल्याणार्थ मार्ग दाखविले ते सर्वानि अवलबविल्यास उद्धार होईल.फैजपुर चे संत श्री पवनदास जी महाराज यानी संत सामाजिक परोपकारी असतात आणि तेच भगवंत प्राप्तिचा मार्ग दखवितात. पंजाब हुन संत श्री जर्मन जी महाराज यांनी संत भगवान रूपी अंश असतात त्यांचे उपकार खुप असून ते दुसऱ्या करिता जगतात त्यानी दाखविलेल्या मार्गावर चालावे. श्रीमती अरुणाताई शिरीष चौधरी यांनी बापूजिनी जो मार्ग दाखविले त्या दिशेने चालावे. महिलांनी मुलांवर चांगले संस्कार टाकावे.बुरहानपुर वाडा येथील संत श्री सरसपुरी जी महाराज यानी भगवान रूपी सद्गुरु बापुजी आम्हाला प्राप्त झाले हे अहोभाग्य आहे.सर्वश्रेष्ट भक्ति असून तो मार्ग आपल्याला दाखविले.आणि वृंदावन हुन आलेले चित्त प्रकाश जी महाराज यांनी मनात श्रद्धा असली तर भगवंताचे दर्शन घडते.संत महात्मा च्या सानिध्यत मुलाना संस्कार मिळते.

त्याच बरोबर व्यासपीठावर कुसुम्बा येथील भरत दास जी महाराज,मथुरा येथील हरिशर्णानद जी महाराज, केशव मबराज,राधे चैतन्य जी महाराज, श्याम चैतन्य जी महाराज,शिव चैतन्य जी महाराज,नवनीत चैतन्य जी महाराज, ब्रज चैतन्य जी महाराज,सर्व चैतन्य जी महाराज, महेश चैतन्य जी महाराज, ऋषि चैतन्य महाराज,शुभ चैतन्य जी महाराज,हरिष चैतन्य जी महाराज, राम चैतन्य महाराज आदि उपस्थित होते.
सूत्रसंचालन दिव्य चैतन्य जी महाराज यांनी केले.तर आलेल्या संत महंताचे आभार श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यानी व्यक्त केले.तसेच कन्नड़ समिति तर्फे उत्तम राठोड व कवडे सर ,रावेर हुन कन्हया शेठ अग्रवाल,नाशिक हुन जाधव सर,नागपुर हुन प्रवीण वंजारी,मुम्बई हुन एल ड़ी चव्हाण व कमलताई राठोड,पाल हुन अर्जुन जाधव व जितेंद्र गवली, बुरहानपुर हुन हंसराज सुगंधि,आदिवासी समिति तर्फे सुदाम बारेला, खरगोन हुन महेश चोपड़ा यांनी समिति तर्फे श्रधांजलि अर्पित केली.

या कार्यक्रमात चैतन्य उत्सव समिति पाल तर्फे श्री माधवराव गोवलकर रक्तदान शिबिर आयोजित केले.व मुम्बई समिति तर्फे रावेर हुन पायी दिंडी पाल येथे दाखल झाली. दी २४ डिसेम्बर रोजी श्री हरिधाम मंदिर वर्धापन दिवस व परम पूज्य सद्गुरु संत श्री महादेव चैतन्य उर्फ दगड़ू जी बापू यांच्या जयंती निमित्ताने दीपोत्सव चे आयोजन करण्यात आले.व दी २५ डिसेम्बर रोजी सकाळी 6 वाजेल पूज्य बापूजी याच्या समाधि स्थळी पूजन हवन करण्यात आले.त्यानतर गुरुदीक्षा,व सत्संग अमृताच्या लाभ भक्तानि घेतला.शेवटी महाआरती व पाल समिति तर्फे महाप्रसाद चा आयोजन करण्यात आले.अशी माहिती
मुस्लिम बांधवांतर्फे समाधीवर हिरवी चादर चडविण्यात आली

टीम झुंजार