थलांबूर (तामिळनाडू):- प्रेम प्रकरणातून सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीला जिवंत जाळून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील थलांबूर इथं घडली आहे.शनिवारी ही धक्कादायक घटना घडली असून आर. नंदिनी (वय २५) असे मृत तरुणीचं नाव आहे. पोलिस पथकाने सदर तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला.मिळालेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी रात्री एक तरुणी पोलिसांना अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर, हातावर आणि पायावर ब्लेडच्या खोल जखमा झाल्या होत्या.
पोलिसांनी सदर तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आर. नंदिनी असं तिचं नाव असल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे असून ती मूळची मदुराई येथील रहिवासी असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.नंदिनी आणि पांडी माहेश्वरी (वय २६) हा तृतीयपंथी हे मदुराईतील एकाच महाविद्यालयात एकत्र शिकले होते. पुढे माहेश्वरी याने आपलं नाव बदलून वेत्रीमारण असं ठेवलं. नंदिनी आणि वेत्रीमारण हे गेल्या आठ महिन्यांपासून थोराईपक्कम येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते.
यादरम्यान ती वेत्रीमारण याच्या प्रेमात पडली. मात्र नंतर दोघांमध्ये खटके उडाले आणि नंदिनी ही वेत्रीमारण याच्यापासून दूर झाली. मात्र नंदिनीच्या या निर्णयाने वेत्रीमारण संतापला आणि त्याने तिचा काटा काढण्याचं ठरवलं.दरम्यान, २४ डिसेंबर रोजी नंदिनीचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सरप्राइज गिफ्ट देणार असल्याचं सांगून वेत्रीमारण याने नंदिनीला एका अज्ञात ठिकाणी नेलं आणि तिथं तिची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी शनिवारी वेत्रीमारण याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.