धक्कादायक! एकटी झोपलेल्या विधवा सुनेच्या खोलीतून मध्यरात्री आला विचित्र आवाज,समोरील दृश्य पाहून सासऱ्याला बसला धक्का.

Spread the love

भरतपूर : रामप्रसाद शर्मा नावाची व्यक्ती. ज्यांचा मुलगा पवन बेपत्ता झाला होता. तो घरी परतलाच नाही. पोलिसांनी शोध घेतला आणि तो सापडला नाही. त्याचं ब्लाइंड मर्डर झाल्याचं समजून पोलिसांनी हा तपास सोडून दिला.रामप्रसाद आणि त्यांचं कुटुंबही मुलाच्या मृत्यूचं दुःख विसरून आयुष्य जगू लागले होते. पण त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांची विधवा सून ज्या खोलीत एकटी झोपत होती, तिथून रात्री विचित्र आवाज येऊ लागला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि जे दृश्य दिसलं ते पाहून ते हादरले.

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील नूह गावातील हे प्रकरण. 16 ऑक्टोबर 2022… त्या रात्री पवनचे वडील रामप्रसाद शर्मा यांना झोप येत नव्हती. ते खोलीतून बाहेर आले आणि अंगणात चालू लागला. त्यांनी पाहिलं की रात्रीचे दोन वाजले होते आणि त्यांच्या सुनेच्या खोलीतील लाईट चालू होती. एवढंच नाही तर सुनेच्या खोलीतून काही विचित्र आवाजही येत आहेत. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला.त्यांची सून रिमा आणि शेजारचा मुलगा भोला आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचं त्यांना दिसले. रामप्रसाद यांनी दरवाजा ठोठावला. सून आणि भोला यांना शिवीगाळ केली.

त्यावेळी भोलाने रामप्रसाद शर्मा यांना धमकी दिली की, या घटनेबाबत कुणाला काही सांगितलं तर त्यांनाही त्यांचा आपल्या मुलाप्रमाणेच परिणाम भोगावे लागतील. धमकी ऐकून रामप्रसाद त्यावेळी शांत झाले आणि भोलाही तिथून निघून गेला. मात्र सकाळ होताच रामप्रसादने पोलिसांना हा प्रकार सांगितला.पवन हत्येप्रकरणी पोलिसांना आधीच संशय असल्याने पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता रिमा आणि भोला यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. मग जे उघड झालं ते ऐकून सर्वजण हैराण झाले.पवन आणि त्याची पत्नी रिमा यांचं 2015 साली झालं. पवन रिमापेक्षा 14 वर्षांनी मोठा. तेव्हा तो दिल्लीतील एका कारखान्यत काम करत होता. त्यांना दोन मुलं झाली. मुलगा कार्तिक आणि मुलगी कृतिका. पवनला जारी पिण्याचं व्यसन, रिमाला तो समाधानी ठेवू शकत नव्हता.

लग्नानंतर काही दिवसांनी पवन रिमाला घेऊन दिल्लीला आला. तिथं शेजारचा तरुण भोला रिमाला आणि गावातील तरुण भोला तिला खूप भेटायला लागला. पवन कामावर गेला की भोला तिला भेटायला यायचा. रिमा पवनमध्ये दुरावा आणि रिमा-भोलामध्ये जवळीक वाढली. नंतर कोरोना काळात पवन रिमाला घेऊन पुन्हा घरी गेला. पण रिमा भोलाला विसरली नाही.भोलाला भेटायचं असायचं तेव्हा ती त्याला मेसेज करायची. तो येण्याआधी ती घरच्यांना जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून द्यायची. सकाळ होण्याआधी ती त्याला घरातून बाहेर पाठवायची. 29 मे 2022 च्या रात्री भोला आणि रिमा खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत होते. त्याचवेळी शेजारी झोपलेला पवन जागा झाला आणि त्या दोघांना त्या अवस्थेत पाहून त्याला धक्काच बसला. त्याने रिमा आणि भोलाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, रिमाने त्याचा पाय पकडला आणि भोलाने त्याचा गळा दाबला.पवनचा मृत्यू झाल्याचं दोघांना वाटल्याने भोलानं त्याचा मित्र दीपच्या मदतीने पवनला कपड्यात गुंडाळून दुचाकीवर बसवून अर्धा किलोमीटर दूर नेले, त्याच्या अंगावर 50 किलो वजनाचा दगड बांधला आणि कालव्यात फेकून दिलं. त्यानंतर ते तिथून दिल्लीला गेले. इकडे रिमाने घर साफ केलं. सकाळी पवनचा शोध सुरू झाला तेव्हा रिमाने सांगितले की ते दोघे एकत्र झोपले होते, मात्र रात्री उशिरा तो अचानक उठून बाहेर गेला आणि परत आला नाही. टीव्ही 9 हिंदीच्या वृत्तानुसार तिच्या जबानीत विसंगती असल्याने पोलिसांना संशय आला, मात्र सासरे रामप्रसाद यांचा तिच्यावर विश्वास होता, त्यामुळे पोलिसांना त्यावेळी रिमाची चौकशी करता आली नाही. आता जेव्हा चौकशी झाली तेव्हा संपूर्ण घटना ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

हे पण वाचा

टीम झुंजार