जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
जामनेर : इन्स्टाग्रामवर पत्नीच्या नावे बनावट खाते तयार करुन तिच्या चारित्र्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याने तसेच याबाबत गावक-यांकडून होणारी विचारणा यामुळे व्यथित पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेतील मयत पतीच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या नावाचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करणा-या अज्ञात खातेधारकाविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील एका विवाहितेच्या नावाने कुणीतरी बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. त्यावर मी …… रुपये घेणार मला कधीही फोन करा…. माझा नंबर …….. याशिवाय इतर बदनामीकारक मजकुर प्रसिद्ध केला. या मजकुराचा विवाहितेसह तिच्या पतीला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे विवाहितेच्या पतीने आत्महत्या केली. आपल्या पतीच्या आत्महत्येस प्रवृत्त करणा-या इन्स्टाग्राम खातेधारकाविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास जामनेर पोलिस स्टेशनचे हे.कॉ. अतुल पवार करत आहेत.
हे पण पहा
- गुणगौरव समारंभामुळे गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रोत्साहन आमदार मा.अमोलदादा पाटील
- मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या दोघांना डंपरची जोरदार धडक,दुचाकीस्वार तरुण ठार तर मित्र गंभीर जखमी.
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन