धक्कादायक! लहान बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत; मोठ्या भावाने ओलांडल्या सर्व मर्यादा

Spread the love

भंडारा:- सख्या भावानेच चारित्र्यावर संशय घेत लहान बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे.बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत भावाने केलेल्या बेदम मारहाणीत बहिणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित आरोपी आशिष गोपीचंद बावनकुळे (वय 20) याला पोलिसांनी अटक केली आहे. मृतक बहिणीचे नाव अश्विनी बावनकुळे (20) असे आहे.मृत मुलीच्या मोठ्या भावाने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. यावरून तिचे भावासोबत शाब्दिक भांडण झाले. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. त्याने तिला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीतच मुलीचा मृत्यू झाला. तक्रारीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून सशयित आरोपी आशिष बावनकुळे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पैशासाठी पोटच्या मुलीला ढकलला देह व्यापारात
भंडारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय स्वतःच्याच मुलीला आई वडिलांनी पैशासाठी विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला भाग पाडल्याचा गंभीर प्रकार भंडाऱ्यात घडला आहे. पीडितेच्या काकीने आरोपाची तक्रार पोलिसात केल्यानंतर हा घृणास्पद आणि खळबळजनक प्रकार समोर आला.

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील वडद गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. आई वडिलांनीच पोटच्या मुलीला देहव्यापारात ढकललं आहे. पीडितेच्या काकीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पीडितेच्या आई-वडील आणि अन्य एका महिलेसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. तर, एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडिता ही साकोली येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. गावावरून रोज येण्याजाण्यासाठी त्रास होत असल्याने ती साकोली येथील काकाकडे राहून शिक्षण घेत होती. मात्र, कालांतराने पीडितेच्या वडिलांनी तिला गावाला नेले. बऱ्याच दिवसापासून पीडीतेसोबत बोलणे झाले नसल्याने काकाने 14 डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबीयांची चौकशी केली.

यावेळी पीडीतेने घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला.याप्रकरणी काकूने पुढाकार घेत पीडितेला साकोली पोलीस ठाण्यात आली याची तक्रार नोंदवली. पैशासाठी पोटच्या मुलीला आई आणि वडिलांनीच ओळखीतल्या काही इसमांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी केली. हा प्रकार वाढत गेल्याने महिन्याभरामध्ये तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरीत्या अत्याचार करण्यात आले. कधी पीडितेच्या गावातील घरीच आई-वडिलांना समक्ष तर कधी साकोली तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडितेला मारहाण करीत अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली असून यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार