Viral Video:भररस्त्यावर रुसलेल्या प्रेयसीला मनवून थकला शेवटी हतबल झालेल्या प्रियकराने अस काही केलं की तुम्ही लावाल डोक्याला हात.

Spread the love

Viral Video : ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं’ हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. खरं तर प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते. सोशल मीडियावर प्रेमी जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे जोडपे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसून येतात तर कधी हे जोडपे एकमेकांबरोबर भांडताना दिसतात. कधी यांचे व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येते तर कधी त्यांचे दु:ख पाहून वाईट वाटतं.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत एक तरुण भर रस्त्यावर त्याच्या रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनवताना दिसत आहे. हतबल बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडसाठी असं काही केलं की पाहून तुम्हीही डोकं धराल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण स्कुटीवर बसलेला दिसतोय आणि त्याच्या शेजारी त्याची गर्लफ्रेंड उभी असते. तो गर्लफ्रेंडला स्कुटीवर बसण्यास सांगतो पण ती ऐकत नाही. रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनवताना त्याच्या नाकी नऊ येतात.

शेवटी गर्लफ्रेंड त्याच्या समोरुन पायी निघताना पाहून हा तरुण सुद्धा स्कुटी पायाने पुढे नेताना दिसतो आणि तिच्या चालण्याच्या स्पीडनुसार स्कुटी चालवताना दिसतो.बिचाऱ्या बॉयफ्रेंडची ही अवस्था पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. काहींना या तरुणची दया येईल तर काहींना यालाच प्रेम म्हणतात, असे वाटू शकते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओवर लिहिलेल्या कॅप्शननुसार हा व्हिडीओ झारखंड राज्यातील दुमका या शहरातील आहे.

frosty_dumka या इन्स्टाग्राम अकाउंटवरील हा व्हिडीओ असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘यामुळे पेट्रोलचे भाव वाढले आहेत. तर एका युजरने लिहिलेय, ‘भावाची स्कुटी पंक्चर झाली वाटते.’ आणखी एका युजरने लिहिलेय, ‘मुली कधीच एवढं मनवताना दिसत नाही जेवढं मुले मनवतात’ काही युजर्सनी व्हिडीओ काढणाऱ्या कॅमेरामॅनची सुद्धा खिल्ली उडवली आहे.

https://www.instagram.com/reel/C1CM-B8t1ps/?igsh=MXF0NXdicGppN2RlOQ==
टीम झुंजार