ग्रामपंचायती बरोबरच धान्य दुकानात सुद्धा मिळणार आयुष्यमान भारत कार्ड, तहसीलदार कार्यालया मार्फत १७४ धान्य दुकानदारांना प्रशिक्षण

Spread the love

जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यात ग्रामपंचायती बरोबरच आता धान्य दुकानातून सुद्धा आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून मिळणार आहे.सेतू केंद्रांची संख्या अत्यल्प असल्याने नागरिकांची आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी पायपीट होत होती याची दखल घेऊन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी तालुक्यातील सर्व धान्य दुकानदारांना आयुष्यमान भरात कार्ड काढण्याचे प्रशिक्षण आज तालुका तहसीलदार कार्यालया मार्फत दिले.

आयुष्यमान भारत कार्डचे लाभार्थी हे धान्य दुकानातून धान्य घेणारे लाभार्थी असल्याने धान्य दुकानदार त्यांचे थम इम्प्रेशन घेऊन स्थानिक पातळीवर प्रकिया पूर्ण करू शकतील.धान्य वितरीत करतांना जी प्रणाली अवलंबली जाते त्याच प्रणालीने आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची प्रकिया पूर्ण होणार असल्याने धान्य दुकानात तात्काळ आयुष्यमान भारत कार्ड मिळू शकते.आयुष्यमान भारत कार्ड असणाऱ्या नागरिकांना नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत शुल्क माफ आहेत.

प्रशिक्षण प्रसंगी तहसीलदार नानासाहेब आगळे,गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे,पुरवठा अधिकारी विवेक वैराळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत,डॉ.नरेश पाटील,आरोग्य विस्तार अधिकारी सुनील सूर्यवंशी, आरोग्य पर्यवेक्षक बशीर पिंजारी,रवींद्र सूर्यवंशी, हेमंत पाटील,स्वप्नील महाजन,किशोर पाटील,धीरज पाटील,धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तेजराव ठोंबरे, सचिव राजेंद्र देशपांडे,सर्व धान्य दुकानदार,सर्व आरोग्य सेवक व गटप्रवर्तक ज्योती पाटील,आर्चना टोके,सविता कुमावद,यमुना जाधव, उपस्थीत होते.

हे पण वाचा

टीम झुंजार