चोपडा :- काॅंगेसचे माजी जिल्हाध्यक्ष अँड संदीप पाटील यांची चोपडा शहरातील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सहाय्यक लेखापाल संशयित समाधान दत्तात्रय पाटील याने २०१४ ते २०२२ या काळात तब्बल ५० लाख ६७ हजार ८९३ रुपयांचा गैरव्यवहार करून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजय नारायण बोरसे (वय ५३, रा. परीस पार्क, चोपडा) यांनी या संदर्भात फिर्याद दिली असून,
या फिर्यादीत नमूद केले, की श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय (चोपडा) या ठिकाणी लिपिक (असिस्टंट अकाउंटंट) म्हणून काम करणारे समाधान दत्तात्रय पाटील यांनी २०१४ ते २०२२ दरम्यान संस्थेत विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असलेला डाटा, त्यांच्याकडून घेतलेली फी, याची माहिती ठेवण्यासाठी वापरात येण्यात असलेले सॉफ्टवेअर, स्वतःच्या नावाचा यूजर आयडी, पासवर्ड तसेच सुभाष यादवराव पाटील,

पी. ए. देशमुख आणि संजय नरेंद्र कुलकर्णी यांचा एसएमके यूजर आयडी पासवर्डचा दुरुपयोग करून २ हजार ९४३ विद्यार्थ्यांकडून फी म्हणून पैसे घेऊन त्यांची स्वाक्षरी करून पैसे घेतल्याची पावती दिली. परंतु त्यांच्या कॅशबुकमध्ये नोंद न करता ५० लाख ६७ हजार ८९७ रुपयांचा गैरव्यवहार करून संस्थेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी समाधान पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष चव्हाण तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.