जळगाव :- शहरातील वाघनगर परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय पल्लवी योगेश पाटील या विवाहितेचा रविवार, २४ डिसेंबर २०२३ रोजी संशयास्पद मृत्यू झाला असून, तिचा घातपात झाल्याचा आरोप भाऊ मंगेश चौधरी यांनी केला आहे, तर विवाहिता कोसळल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे.मृत्यू झालेल्या विवाहितेला दोन मुली असून मुलगा होत नसल्याच्या कारनाने विवाहितेचा छळ सासरच्या मंडळी कडून करण्यात येतं असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.
जळगाव शहरातील वाघनगर परिसरात पल्लवी पाटील या वास्तव्यास होत्या. त्यांचे पती जिल्हा परिषदमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरीला असून, त्यांना दोन मुली आहेत. रविवारी पल्लवी पाटील यांच्या मृत्यूविषयी कुटुंबीयांनी त्यांच्या माहेरी फोन केला तुमची मुलगी कोसळल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे माहेरची मंडळी सासरी पोहोचली. त्यांनी विवाहितेचा मृतदेह बघितला असता त्यांना विवाहितेच्या मानेवर गळफास घेतल्याचे व्रण दिसून आले, तसेच त्यांच्या पोटावर मारहाणीच्यादेखील जखमा असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

विवाहितेने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप करीत संशय व्यक्त केला.विवाहितेला मुलगा होत नसल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. याच कारणावरून कोरोनाकाळात विवाहिता या दहा महिने माहेरीच होत्या. मात्र, त्यानंतर त्या पुन्हा सासरी नांदण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले.घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर मयत पल्लवी पाटील यांचे वडील गणेश चौधरी, भाऊ मंगेश चौधरी यांच्यासह नातेवाइकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. तसेच आपल्या बहिणीला न्याय मिळावा, अशी मागणी मंगेश चौधरींनी केली.याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.