नागपूर :- मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी महिला तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.तसेच त्यांना डांबून ठेवून तिघींवर बलात्कार केल्याचे देखील समोर आले आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध अपहरण, बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत माहिती अशी, की काटोल येथे एका महिलेची प्रसुती झाली आहे. तिची देखभाल केल्यास चांगले पैसे मिळतील, असे नंदाने २६ वर्षीय विवाहित महिलेला सांगितले. २५ जुलैला नंदा ही पीडित महिला आणि तिच्या चार वर्षीय मुलीसह रेल्वेने काटोलला जायला निघाली.रेल्वेत आधीच नंदाची साथीदार मंगला होती. तिने पीडितेकडील मोबाइल हिसकावला. चार वर्षीय मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे ती खूपच घाबरली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.

यावेळी दोन अल्पवयीन मुलीही तिथे होत्या. दोघीही त्यांना घेऊन राजकोटला गेल्या. तेथे नंदाचा साथीदार भेटला. तेथे दोन अल्पवयीन मुली आणि पीडित महिलेचे तीन पुरुषांसोबत लग्न लावून दिले. नंतर संतोष हा पीडित महिलेला घेऊन जामनगरला आला.याठिकाणी त्याने व त्याच्या दोन भावांनी पीडित महिलेला खोलीत डांबले. तसेच तिच्यावर बलात्कार केला. नंतर पीडितेने स्वत:ची कशीबशी सुटका केली. व ती नागपूरला आली. तिने घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हे पण वाचा
- ViralVideo:पतीने आपल्या पत्नीला परपुरुषासोबत भररस्त्यात रंगेहात पकडले, पतीला आला संताप, पुढे काय झालं पहा व्हिडिओ.
- मुख्याध्यापिकेला रग्गड पगार तरीपण पैशांचा मोह आवरेना; प्रसूती रजा मंजुरीसाठी 36 हजार रुपयांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.
- अमळनेर तालुक्यात ३२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा.
- पंचायत समिती कडुन नागरीकांना होणाऱ्या गैरसोयी तातडीने थांबवा – आमदार मा.अमोलदादा पाटील
- जळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा,8 जुगारींना अटक, 20 लाख रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल जप्त.