वाचा अत्यंत गरीब कुटुंबाची वेदनादायी कहाणी, तुम्हालाही धक्का बसेल
कौशांबी, : उत्तर प्रदेशातल्या कौशांबी जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. तिला झालेल्या मुलाची तस्करी करण्याचा प्रयत्न झाल्याचंही उघडकीस आलं आहे.ती गर्भवती झाल्यावर तिच्या पोटात ट्यूमर झालेला असू शकेल, असं तिच्या कुटुंबीयांना खोटंच सांगून एका खासगी हॉस्पिटलमध्ये तिची डिलिव्हरी करण्यात आली. या धक्कादायक प्रकाराची माहिती कळताच सीडब्ल्यूसीने (बालकल्याण समिती) पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेतले. सीडब्ल्यूसीने दखल घेतल्यानंतर पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चरवा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ही घटना घडली आहे. एसपी ब्रजेशकुमार श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
अत्यंत गरीब कुटुंबाची वेदनादायी कहाणी
चरवा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात एक अत्यंत गरीब कुटुंब राहतं. गरीब आणि निरक्षर असलेल्या या दाम्पत्याने सात मुलांना जन्म दिला. त्यांचं पोट भरण्याची चिंता असल्याने त्यांना शिक्षण मात्र दिलं नाही. सध्या त्या सात भावंडांपैकी दोन भाऊ दिल्ली आणि मुंबईत मजुरी करतात. त्यातून तीन बहिणींच्या लग्नाचं कर्ज फेडतात. दोन मुली अद्याप अल्पवयीन असल्याने घरीच असतात. सहावी मुलगी मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. असं अत्यंत कष्टप्रद जीवन असूनही हे कुटुंब कष्ट करून चार घास सुखाने खाऊन गुजराण करत होतं; मात्र त्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली.पाच वर्षांपूर्वी या दाम्पत्याच्या पाचव्या क्रमांकाच्या मुलीचा राजन नावाच्या मद्यपी व्यक्तीशी विवाह झाला. त्याचे अत्याचार सहन न झाल्याने ती कोणा अज्ञात तरुणाबरोबर पळून गेली. तिचं लहान बाळ तिने घरीच सोडलं.
आपली मुलगी सासरहून पळून गेल्याने त्या बाळाला अखेर तिच्या माहेरी आणलं गेलं. त्या बाळाचा पिता आणि त्या कुटुंबाचा जावई राजन आपल्या बाळाला भेटायला कधी तरी येत असे. फेब्रुवारी 2023मध्ये सासू-सासरे कामाला गेलेले असताना जावई राजन सासरी आला आणि घरी असलेल्या आपल्या अल्पवयीन मेव्हणीवर त्याने जबरदस्तीने बलात्कार केला. तिने कोणाला काही सांगू नये, म्हणून तिला घाबरवण्यात आलं. तिने जेव्हा हे सांगितलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता, असं पीडितेची आई म्हणाली. राजनने सुरुवातीला तिच्या पोटात ट्यूमर झाल्याची शक्यता वर्तवून दिशाभूल केली. एका हकिमाकडून त्याने जडी-बूटीदेखील खाऊ घातली. अखेर पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतरच तिच्या पोटाचा आकार वाढणं थांबलं.पीडितेने सांगितलं, ‘भाऊजी (आरोपी राजन) घरी आला, तेव्हा मी त्यांच्याच बाळाला भरवत होते. तो नशेत होता.

त्याने पाणी मागितलं, म्हणून दुसऱ्या खोलीत गेला, तेव्हा त्याने तोंड दाबलं आणि दुष्कृत्य केलं. याबद्दल कोणाला सांगितलं, तर रेल्वेच्या रुळांवर फेकून मारून टाकण्याची धमकी दिली. म्हणून मी गप्प राहिले. आई आणि बहिणीने अनेकदा विचारूनही काही सांगितलं नाही. पीडितेच्या आईने सांगितलं, ‘जावयाने आपल्या मुलीशी असं काही वर्तन केलं असेल, याचा जराही अंदाज आला नव्हता. तिचा गर्भ आठ महिन्यांचा झाला तेव्हा जावई तिच्यावर मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन गेला. तिथे एका खासगी क्लिनिकमध्ये त्याने उपचार घ्यायला सुरुवात केली.’मुलीची चौकशी केल्यावर तिच्या आई-वडिलांना खोटा अल्ट्रासाउंड रिपोर्ट दाखवण्यात आला. नऊ महिने पूर्ण झाल्यावर जेव्हा मुलीने बाळाला जन्म दिला, तेव्हा मात्र मुलीच्या आई-वडिलांना धक्काच बसला.
अविवाहित मुलगी आई बनल्यामुळे त्यांना समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही. तितक्यात जावई फरार झाला.30 नोव्हेंबर रोजी सराय अकिलमधल्या जनता पाली क्लिनिकमध्ये पीडित मुलीने एका मुलाला जन्म दिला. नॉर्मल डिलिव्हरी झाल्याने 48 तासांनी पीडितेला डिस्चार्ज मिळाला; पण कुटुंबीय बाळाला हॉस्पिटलमध्येच ठेवून घरी आले. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तिची तिसऱ्या क्रमांकाची मुलगी कल्पनाही गर्भवती असून, तिची डिलिव्हरी लवकरच होणार होती. पीडितेच्या आईने कल्पनाच्या पतीला सांगितलं, की ‘या बाळाला सध्या हॉस्पिटलमध्येच राहू दे. कल्पनाला बाळ झालं, की त्या दोन्ही बाळांना घेऊन घरी येऊ. कल्पनाला जुळी मुलं झाली असं सर्वांना सांगू. त्यामुळे समाजात लाज जाणार नाही. तसंच, पीडिता आणि अन्य एक मुलगी यांचं लग्न ठरण्यातही काही अडचण येणार नाही.’पीडित मुलीचं बाळ 16 डिसेंबरपर्यंत जनता पाली क्लिनिकमध्ये होतं. त्या कालावधीत कल्पनाला बाळ झालं नाही.
दरम्यान, हे नवजात बाळ बेवारस असल्याचं समजून हॉस्पिटलमधली एक नर्स अंजू देवी, डॉ. संदीप सरोज आणि डॉ. आशीष मिश्रा यांच्या मनात वेगळाच बेत शिजला. त्यांनी चित्रकूटमधल्या एका दलालाच्या मार्फत चायल तालुक्यातल्या एका कुटुंबाशी त्या बाळाचा चार लाख रुपयांत सौदा केला. पैसे घेऊन बाळाला त्या परिवाराकडे सुपूर्द करण्याच्या तयारीत डॉक्टर्स असताना दलालाने आपल्याला मिळणार असलेल्या रकमेवरून वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर हे प्रकरण बालकल्याण समितीला (सीडब्ल्यूसी) कळलं. समितीचे अध्यक्ष कमलेश चंद्रा यांनी त्याची दखल घेतली. सीडब्ल्यूसीच्या सदस्यांनी पीडित परिवारासह या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित सर्वांचे जबाब नोंदवले, अशी माहिती चंद्रा यांनी दिली. त्यातून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन किशोर व बालसंरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत योग्य कलमांच्या आधारे चरवा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे, तसंच दोषींना शिक्षा मिळवून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे पण वाचा
- धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा…. महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार
- जन्मदात्या आईच्या मृतदेह समोरून गेला सरणावर, 8 मुली 1मुलगा पैकी कोणीही अंत्यसंस्कारासाठी तयार होईना, पण जमिनीच्या वाटणीला मात्र…..
- Viral Video: घराच्या छतावर पती पत्नीचे भांडण गेले टोकाला; पत्नीने थेट पतीला छतावरूनच खाली फेकले, पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पती होता अनैतिक संबंधात अडसर बायकोने रचला डाव पलंगावर झोपलेल्या नवऱ्यावर वार करून केली हत्या,पोलिसांनी तीन तासात पत्नी व प्रियकराला केली अटक.
- पत्नीच्या आई वडिलांकडून 25 तोळे सोने व 75 लाख रुपये घेऊनही पत्नीस शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या तहसिलदार पतीला अटक.