‘छळ करणाऱ्या’ बॉसला दोन कर्मचाऱ्यांनी ‘हनीट्रॅप’ मध्ये अडकवून केलेत अश्लील फोटो, पत्नी व नातेवाईक यांना केली शेअर अन् घेतला बदला.

Spread the love

वडोदरा :- एका ‘छळ करणाऱ्या’ बॉसला दोन कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर हनीट्रॅप करत तब्बल तीन महिने खेळवले आणि सूड उगवला. यानंतर या कर्मचाऱ्यांनी बॉसला त्याचे नग्न फोटो पाठवले. पुढे हे कर्मचारी इथेच थांबले नाहीत. त्यांनी हे फोटो बॉसच्या पत्नीसह ओळखीच्या लोकांनाही पाठवले.बॉसला हनी ट्रॅप करुन छळणाऱ्यांपैकी एक महिला आहे. जिने बॉसच्या छळाला कंटाळून नोकरी सोडली होती.तीन महिन्यांपूर्वी, या दोन कर्मचाऱ्यांनी हातमिळवणी केली आणि बॉसला हनी ट्रॅपिंग आणि ब्लॅकमेल करून आपल्यावर झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे ठरवले.

तीन महिन्यांपासून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित बॉसने १० दिवसांपूर्वी सायबर क्राइम पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर कामाच्या ठिकाणी त्रास दिल्याचा आणि छळ केल्याचा आरोप करत या आरोपी कर्मचाऱ्यांनी बॉसला हनी ट्रॅप करणाऱ्या दोघांना अटक.”बॉसला हनी ट्रॅप करुन त्याला धडा शिकवण्याची कल्पना माजी महिला कर्मचाऱ्याला सुचली. त्यानंतर तिने आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याने एका महिलेचे बनावट Instagram अकाऊंट बनवले आणि चार महिन्यांपूर्वी गुप्तासोबत चॅटिंग सुरू केले,” असे पोलिसांनी सांगितले.

Instagram अकाऊंट बनवल्यानंतर आरोपींनी अकाऊंटवरून लैंगिक फोटोज, व्हिडिओ आणि मेसेजेस पाठवण्यास सुरुवात केली. यामुळे 30 वर्षांचा असलेल्या बॉसला वाटले की एक महिला त्याच्याशी गप्पा मारत आहे.या दोन्ही आरोपींनी एका वेबसाइटवरून डाउनलोड केलेले हे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बॉसला पाठवले. आणि यातच बॉस आरोपींच्या जाळ्यात अडकला आणि त्याने त्याचे नग्न फोटो आरोपी चालवत असलेल्या अकाउंटवर पाठवली. त्यानंतर या अकाऊंटवरून त्याला कोणताही मेसेज आला नाही.काही दिवसांनंतर, त्यांनी गुप्ताला त्याचे नग्न फोटो आणि त्यांच्या लैंगिक चॅटचे स्क्रीनशॉट त्याच्या ईमेलवर पाठवले. हे पाहिल्यानंतर पीडित बॉस घाबरला कारण त्याला कोणी हनी ट्रॅप केले हे त्याला माहीत नव्हते. सप्टेंबरमध्ये, या आरोपींनी दोघांनी फर्मच्या एचआर विभागाला असाच एक ईमेल पाठवला.

अखेर संयम सुटला

पण हे दोघे आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी हे अश्लील फोटो आणि चॅट बॉसच्या पत्नीला मेल केले आणि फोटोंची प्रिंटआउट स्पीडपोस्टद्वारे ती काम करत असलेल्या कार्यालयात पाठवली. नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत अपमानास्पद आणि धमकी देणार्‍या ईमेल्समधून बॉसची कोणतीही सुटका झाली नाही, तेव्हा गुप्ता यांनी सायबर क्राईमशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आयपी पत्त्याद्वारे दोघांचा माग काढला. “हे कॉर्पोरेट शत्रुत्वाचे प्रकरण होते. आम्ही आवश्यक कायदेशीर पावले उचलली आहेत,” असे वडोदरा येथील एसीपी (सायबर क्राईम) हार्दिक मकाडिया यांनी सांगितले. या दोघांना सीआरपीसी 41 (ए) अंतर्गत त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती परंतु तक्रारदार या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा करण्यास इच्छुक नाही. असे पोलिसांनी सांगितले.

हे पण वाचा

टीम झुंजार