CCTV Video:माॅं तुझे सलाम! 2 मुलं पडली रेल्वे रुळांवर वाचविण्यासाठी आई रेल्वे ट्रॅकवर झोपली; वेगात ट्रेन आली सूदैवाने……पहा व्हिडिओ.

Spread the love

CCTV Video: रेल्वेचा प्रवास फार जपून आणि काळजीपूर्वक करावा लागतो. येथे नेहमीच अपघाताच्या अनेक घटना घडतात. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अशात सोशल मीडियावर काळजात धडकी भरवणारी एक घटना समोर आली आहे. 2 मुलं रेल्वे रुळांवर पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी आईने केलेली धडपड यात दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेनने प्रवास करताना 2 लहान मुलं रेल्वे रुळावर पडली. यावेळी आई त्यांच्यासोबत होती.

समोरून भरधाव वेगात ट्रेन येत होती. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काय करावं आणि काय नाही अशी परिस्थिती आईसमोर उभी राहिली. आपल्या लेकरांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर होईल की काय अशी भीती आणि समोरून येणारी ट्रेन.या विचित्र परिस्थितीमध्ये आईने आपल्या लेकरांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे. यासाठी आईने आपल्या मुलांच्या अंगावर झोपली. प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रूळ यांच्यामध्ये आलेल्या गॅपमध्ये आई आणि तिची दोन लेकरं होती.

त्यांना वाचवण्यासाठी आईने केलेली धडपड पाहून सगळ्यांनीच आईवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.सुनील मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सदर घटना बिहारच्या एका रेल्वे स्थानकातील आहे. 25 सेकंदात झालेल्या या घटनेमुळे उपस्थित सर्वच प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, याचं हे आणखी एक उत्तम उदाहरण आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.घटनेनंतर आरपीएफ जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आई तसेच मुलांना रेल्वे रुळांवरून वरती घेतले. सोशल मीडियावर नेटकरी देखील या घटनेवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. तसेच आईचे भरभरून कौतुक करत आहेत. काळ आला होता पण वेळ नाही, आईने मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत.

टीम झुंजार