जळगाव; जिल्ह्यातील जामनेर पहूर बाजारपेठ रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना वर्षभरासाठी एम पी डी ए कायद्यांतर्गत चार आरोपींना नागपूर कारागृह, अमरावती कारागृह, कोल्हापूर कारागृह व ठाणे कारागृह या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले आहे.जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मधून आलेल्या एम पी डी एफ नुसार गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडे दाखल केले व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडेच ते प्रस्ताव सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी सदर चारही आरोपींना वर्षभरासाठी राज्यातील विविध कारागृहांमध्ये स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.जामनेर तालुक्यातील योगेश भरत राजपूत (290 याच्यावर सात गुन्हे दाखल असून एक प्रतिबंधक कारवाई आहे. हातभट्टी वाला या अंतर्गत जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी प्रस्ताव तयार करून पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला 27 डिसेंबर रोजी मंजुरी दिली. दि. 28 रोजी पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, गणेश अहिरे ,रमेश कुमावत, सुनील राठोड, निलेश सोनार ,निलेश घुले यांनी ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह ठाणे येथे त्याला स्थानबद्ध केले.

बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील योगेश देविदास तायडे (वय 33) याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल असून एक प्रतिबंधक कारवाई आहे. धोकादायक व्यक्ती या संज्ञेत त्याच्याविरुद्ध स्थान बद्धतेचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, आत्माराम भालेराव, निलेश चौधरी, रमण सुरळकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, योगेश माळी, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, अमर अडले, योगेश महाजन यांनी (दि. 29 ) रोजी त्याला ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे स्थानबद्ध केले.
जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशन हद्दीमधील सुपडू बंडू तडवी (वय 42) याच्यावर पहूर पोलिसात 16 गुन्हे दाखल आहे. तर तीन प्रतिबंधक कारवाया करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे, जिजाबराव कोकणे, विजयकुमार पाटील, सरबर तडवी, गजानन ढाकणे, राजेंद्र परदेशी, अविनाश पाटील यांनी दि. 28 रोजी मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे स्थानबद्ध केले.
रावेर पोलीस स्टेशन हद्दीमधील शेख शाहरुख शेख हसन (वय 26) याच्याविरुद्ध रावेर पोलिसात सहा गुन्हे व पाच प्रतिबंधक कारवाया करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी यांनी धोकादायक व्यक्ती या साधनेत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर रावेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, सचिन नवले, सुरेश मेढे, संभाजी बीजागरे, संतोष गोदगे, सुकेश तडवी, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, सचिन घुगे यांनी आरोपीला ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे स्थानबद्ध केले.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.