2 वर्षाची मुलगी व बायकोवरच्या प्रेमासाठी केली तडजोड,तिच्या प्रियकराला स्वतःच्या घरी राहण्याची दिली परवानगी,अन् अखेर नको तेच घडलं

Spread the love

बलिया (उत्तर प्रदेश) :- तडजोडकरण किती महाग पडू शकत, हेच या घटनेतून दिसून आलय. या सगळ्याच शेवट खूप दुर्देवी झाला. प्रियंकाच (25) शिवम गुप्ता (26) बरोबर लग्न झालं. त्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात ती प्रियकर गरजन यादव (23) सोबत पळून गेली. उत्तर प्रदेश बलियामध्ये ती प्रियकर गरजन यादवसोबत राहत होती. ती आपल्यासोबत 2 वर्षाच्या मुलीला घेऊन गेली होती.गरजन दैनंदिन मजुरीवर काम करणारा कामगार आहे. तो प्रियंका आणि शिवमसोबत बहरामपूर गावामध्ये रहायचा.

शिवम शहरात बाईक टॅक्सी चालवण्याचे काम करतो. प्रियंका गरजनसोबत पळून गेल्यानंतर महिन्याभराने शिवमचा तिच्याशी संपर्क झाला. ती गरजनसोबत बलियामध्ये रहायची. शिवम तिथे गेला व घरी सोबत येण्यासाठी प्रियंकाला विनवणी करुन लागला. त्यावेळी तिने एक अट ठेवली. गरजनसोबत राहणार असेल, तरच घरी परत येईन असं तिने सांगितलं. बायको आणि मुलीवरच्या प्रेमासाठी शिवम तयार झाला.

तिच्या विवाहबाह्य संबंधांवरुन भांडण

शिवम, प्रियंका आणि गरजन तिघे एका भाड्याच्या घरात राहू लागले. पण लवकरच अशा प्रकारच्या तडजोडीमधून काय होऊ शकत, ते दिसू लागलं. शिवम आणि प्रियंकामध्ये तिच्या विवाहबाह्य संबंधांवरुन भांडण होऊ लागली. 21 डिसेंबरला शिवम झोपलेला असताना प्रियंकाने आपल्या हाताने त्याचा गळा आवळला. गरजनने चाकूने त्याच्यावर अनके वार केले, असं पोलिसांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

सत्य काय ते सांगून टाकलं

हत्या केल्यानंतर प्रियंका आणि गरजनने शिवमचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला व निर्जन स्थळी फेकून दिला. घरातील रक्ताचे डाग त्यांनी धुवून साफ केले. 22 डिसेंबरला एका वाटसुरुला शिवमचा मृतेदह दिसला. पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा, प्रियंकाने शिवम नाईट शिफ्टसाठी गेला होता असं सांगितलं. गरजन नातेवाईक असून सोबत राहतो असं तिने सांगितलं. तपासात पोलिसांनी तिघे राहत असलेल्या इमारतीच्या पाऱ्यावर रक्ताचे डाग आढळले. पोलिसांना संशय आला. त्यांनी आपला खाक्या दाखवताच प्रियंकाने सत्य काय ते सांगून टाकलं.

हे पण वाचा

टीम झुंजार