सहलीदरम्यान आधी पदर धरला, मग किस केलं मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबत अश्लील फोटो पाहून पालक हादरले.

Spread the love

बेंगळुरू :- विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्याबद्दल समाजात काही रूढ संकेत आहेत. ते संकेत मोडून एखाद्या शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं जेव्हा वेगळंच वळण घेतं तेव्हा त्यावर चर्चा तर होणारच.शाळेची मुख्याध्यापिका आणि विद्यार्थ्याचं एक रोमॅंटिक फोटोसेशन नुकतंच इंटरनेटवर व्हायरल झालंय आणि त्यावरून चर्चांना उधाण आलंय. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ही घटना बेंगळुरूमधली आहे.या फोटोशूटमध्ये दिसणारा विद्यार्थी दहावीत शिकतो.

विद्यार्थी आणि त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने सहलीला गेलेले असताना कुठल्या तरी सिनेमातल्या प्रसंगाची नक्कल करणारं फोटोशूट केल्याचं समोर आलंय. हे फोटो व्हायरल झाल्यामुळे विद्यार्थ्याचे पालक अक्षरशः हैराण झालेत. हे फोटो समोर आल्यानंतर मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आलंय आणि तिची चौकशीही सुरू असल्याचं समजतंय.कर्नाटकमधल्या मुरुगमल्ला गावातल्या शाळेतला विद्यार्थी आणि शाळेची मुख्याध्यापिका यांनी हे कृत्य केलं आहे. शैक्षणिक सहलीसाठी गेले असताना तिथे या दोघांचे अत्यंत जवळीक साधणारे फोटो काढण्यात आले.

दहावीतल्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेला उचलून घेतल्याचे फोटोही काढण्यात आले आहेत. या जवळीक साधणाऱ्या फोटोजमुळे सदर विद्यार्थ्याच्या पालकांबरोबरच इतर सगळेच पालक अवाक झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली. दरम्यानच्या काळात मुख्याध्यापिकेने काही फोटो आणि व्हिडिओ डिलीट केल्याचंही लक्षात आलंय. धक्कादायक गोष्ट, अशी की हे फोटो दुसऱ्या विद्यार्थ्याकडूनच काढून घेण्यात आले आहेत. या प्रकरणात मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आलं असलं, तरी पालकांच्या अस्वस्थतेत मात्र भरच पडली आहे.

इंटरनेट सारख्या माध्यमांच्या उपलब्धतेमुळे कित्येक अनावश्यक गोष्टी नको त्या वयातच मुलांसमोर येत आहेत. त्यामुळे मुलं भरकटण्याचं, हट्टी आणि दुराग्रही होण्याचं, तसंच मानसिक आजारांना बळी पडण्याचं प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे समाजासमोर एक नवीनच चिंता उभी राहिली आहे. वयात येणाऱ्या मुलींप्रमाणेच मुलांशीही पालक आणि शिक्षकांचा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे तो यासाठीच; पण तो संवाद साधताना ती भरकटणार नाहीत हे पाहणंही आवश्यक आहे. पालकांव्यतिरिक्त मुलं सर्वाधिक वेळ शाळेत आपल्या शिक्षकांबरोबर असतात. मुलांवर शिक्षकांचा प्रचंड प्रभावही असतो; पण आता शिक्षक आणि विद्यार्थी हे नातंही अशी वळणं घेत असेल तर मुलांना शाळेत पाठवतानाही पालक चिंताग्रस्तच राहतील हे नक्की.

हे पण वाचा

टीम झुंजार