नागपूर : इन्स्टाग्रामवर मेत्री केल्यानंतर लग्नाचे आमीष दाखवून एका २५ वर्षीय युवतीशी शारिरीक संबंध प्रस्थापित करू तिचे सर्वस्व लुटणाऱ्या आरोपीविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमित सुनिल मालेवार (वय २९, रा. अभ्यंकरनगर, तुमसर जि. भंडारा ह. मु. बजाजनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ डिसेंबर २०२१ ते १० आॅक्टोबर २०२३ दरम्यान आरोपीचे हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया २५ वर्षीय युवतीशी इन्स्टाग्रामवर मेत्री झाली. दोघेही खासगी जॉब करतात. इन्स्टाग्रामवर चॅटींग करताना ते ऐकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.

त्यानंतर आरोपी प्रियकराने तिला लग्नाचे आमीष दाखवून बजाजनगर येथील आपल्या किरायाच्या खोलीत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.युवतीने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने बजाजनगर पोलिसात तक्रार दाखल केली. बजाजनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी बोरकर यांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (एन) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






