येणारा आठवडा कसा जाणार याचं कुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते.जाणून घ्या आपल्या राशीसाठी येणारा आठवडा कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
या सप्ताहात मकर राशीत सूर्य प्रवेश, बुध, शनी युती होत आहे. कामात अडचणी येतील. क्षुल्लक कारणाने चिडचिड करू नका. धंदा वाढेल. नवीन ओळखीने तुमचा फायदा होईल. मार्ग मिळेल. नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात कराल.राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे बुद्धिचातुर्य उपयोगात आणा. नवा खेळ खेळा. यश व प्रसिद्धी मिळेल. आर्थिक सहाय्य मिळेल. घरातील जवळच्या व्यक्तीची चिंता वाटेल. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. संशोधनाच्या कामात प्रगत विचार उपयोगी येतील. नोकरीतील ताण कमी होईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात लक्ष द्यावे तरच यश मिळेल. चांगली संगत ठेवावी. शुभ दि. ३१, ४
वृषभ:
या सप्ताहात मकरेत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रति युती होत आहे. धंद्यात जम बसवण्याचा प्रयत्न करा. कामगारांना समज देताना गोड बोला. तुमचे काम होईल. नवीन वर्षाचे स्वागत आनंदात, उत्साहात कराल. राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव कमी होईल. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांच्या सल्ल्याने पुढे जा. धंद्यात किरकोळ अडचण येईल. हिशोबात चूक करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात आश्वासन मिळेल. नवीन ओळखीचा उपयोग होईल. कोर्ट केसमध्ये दिशा देणारा संवाद होईल. संशोधनाच्या कामात पुढे जाल. सहकारी मदत करतील. घरातील वातावरण उत्साहाचे राहील. विद्यार्थी वर्गाने मौज-मजेबरोबर मोठ्या परीक्षेसाठी अभ्यास करावा.
मिथुन:
या सप्ताहात मकरेत सूर्य प्रवेश, बुध, शनी युती होत आहे. महत्त्वाचे काम आजच करून घ्या. सामाजिक कार्यात यश येईल. भेट घेता येईल. धंद्यात वाढ व फायदा होईल. या सप्ताहात तुम्हाला राजकीय-सामाजिक कार्यात तत्पर राहावे लागेल. नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात कराल. वेळकाढू धोरण ठेवल्यास वरिष्ठ नाराज होतील. लोकांचा विरोध होईल. धंद्यात तुम्ही प्रयत्नाने मोठे काम मिळवू शकाल. कुठेही दादागिरी करून चालणार नाही. बुद्धिचातुर्य कोर्टाच्या कामात वापरा. साक्षीदार फिरण्याची शक्यता आहे. कला-क्रीडा क्षेत्रात वारा येईल तशी पाठ फिरवा. वाद वाढवू नका. संशोधनाच्या कामात दिशाभूल होऊ शकते. विद्यार्थी वर्गाने मोठ्या माणसांचा विचार ऐकावा. त्यांना उद्धटपणे बोलू नये. यशासाठी प्रयत्न करा. शुभ दि. २,६
कर्क:
या सप्ताहात मकरेत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रति युती होत आहे. तुमच्या मनाची उभारी राहील. कठीण काम करून घेता येईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. नवीन वर्षाचे स्वागत नातेवाईकांसोबत उत्साहात कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. लोकप्रियता मिळेल. योजनांना गती द्या. उद्योग-धंद्यात वाढ करण्यात अडचणी येऊ शकतात. करार करताना विचार करा. थकबाकी मिळू शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी मिळेल. कोर्टाच्या कामात योग्य व्यक्तीची मदत मिळेल. नोकरीतील तणाव कमी होईल. संशोधनाच्या कामातील त्रुटी शोधता येईल. वरिष्ठांच्या बरोबर राहावे लागेल. नवीन ओळखीमुळे उत्साह राहील. घरात शुभ समाचार मिळेल. मुलांनी अभ्यासात लक्ष द्यावे. शुभ दि. ३१, ३
सिंह:
या सप्ताहात मकरेत सूर्य प्रवेश, बुध, शनी युती होत आहे. धावपळ जास्त होईल. वाहन जपून चालवा. थकवा वाटेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. खर्च वाढेल. नवीन वर्षाचे स्वागत मित्र-मैत्रिणींसोबत आनंदात कराल. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्त कारवाया होतील. मनस्ताप वाटेल. कोणताही मोह टाळा. धंद्यात काम मिळवता येईल. क्षुल्लक कारणाने कुठेही चिडचिड करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद होऊ शकतो. प्रसिद्धीसाठी वाट पहावी लागेल. कोर्ट केस सावधपणे हाताळा. संशोधनाच्या कामात विचारशक्तीचा उपयोग करा. कुणालाही कमी समजू नका. विद्यार्थी वर्गाने अभ्यास करावा. प्रेमात फसगत होईल. तुमचे मन उदास राहील. शुभ दि. १,४
कन्या:
या सप्ताहात मकरेत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रति युती होत आहे. नातलगांची भेट होईल. आनंदी रहाल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. धंद्यात जम बसेल. थकबाकी मिळवा. घरातील व्यक्तींसोबत नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही योजनांकडे लक्ष द्या. लोकांच्या समस्यांवर उपाय शोधा. घरगुती वाटाघाटीत किरकोळ तणाव होईल. खर्च वाढेल. उत्साहाच्या भरात वाहन वेगाने चालवू नका. कायदा पाळा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्ट केसमध्ये प्रसंगानुरूप योग्य तेच बोला. संशोधनाच्या कामात यश येईल. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवून अभ्यास करावा. घर, वाहन, जमीन खरेदी करता येईल. शुभ दि. २, ५
तूळ:
या सप्ताहात मकर राशीत सूर्य प्रवेश, बुध, शनी युती होत आहे. तुम्ही ठरवाल एक मात्र करावे लागेल दुसरेच. त्यामुळे मन अस्थिर होईल. अचानक पाहुणे येतील. धंद्यात वाद करू नका. धंद्यात हिशोब नीट करा. किचकट प्रश्न विचारून तुम्हाला समोरची व्यक्ती कंटाळा आणेल. सहनशीलता ठेवा. पाहुण्यांसोबत नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात कराल. राजकीय-सामाजिक कार्यात चूक होण्याचा संभव आहे. कोर्ट केसमध्ये प्रसंगावधान ठेवा. कला-क्रीडा साहित्यात नव्या दिशेने जाण्याचे ठरवाल. तुमच्या कामाचे श्रेय दुसरा घेऊ शकतो. संशोधनाच्या कामात वेळ जास्त खर्च होईल. मैत्रीचा फायदा होईल. विद्यार्थ्यांनी नम्रपणे वागावे. शुभ दि. ३, ६
वृश्चिक:
या सप्ताहात मकर राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रति युती होत आहे. धंद्यात जम बसवता येईल. महत्त्वाचे काम आजच करून घ्या. भेटीत यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोतेवाईक, मित्र-मैत्रिणींसोबत नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात कराल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रेरणादायी विचार तुम्हाला सुचतील. सरकारी वर्गाला सन्मानाने वागवा. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. ओळखीतून काम मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. मोठे काम मिळेल. कौतुक होईल. कोर्ट केसमध्ये आशादायक परिस्थिती राहील. संशोधनात यश मिळेल. नोकरी मिळेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. शुभ दि. ३१, २
धनु:
या सप्ताहात मकरेत सूर्य प्रवेश, बुध, शनी युती होत आहे. तुमचा विचार योग्य ठरेल. धंद्यात वाढ करता येईल. नवीन काम मिळेल. प्रवासात घाई करू नका. ओळखी होतील. घरातील सदस्य, नातेवाईक यांच्या सोबत नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात कराल. राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने कामे करा. लोकांना वेळ द्यावा लागेल. तुम्ही रागावर ताबा ठेवा. घरगुती समस्या किरकोळ असतील. तणाव होईल. संयमाने संकटातून मार्ग निघेल. कला-क्रीडा क्षेत्रात नव्याने वाटचाल करता येईल. साहित्याला विषय मिळेल. व्यसनापासून दूर रहा. वरिष्ठ मदत करतील. विद्यार्थी वर्गाने ध्येय समोर ठेवावे. अभ्यासात आळस करू नये. शुभ १, ३
मकर:
या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरू प्रति युती होत आहे. तुमचा दिवस वेगाने जाईल. ठरविलेले काम पूर्ण करू शकाल. नातलगांची भेट होईल. धंद्यात फायदा होईल. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात, आनंदात कराल. राजकीय-सामाजिक कार्यात सुधारणा होईल. गैरसमज झाला होता तो दूर करता येईल. लोकांचे सहाय्य मिळेल. धंद्यात कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. घर, वाहन, जमीन खरेदी करताना सावध रहा. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्टाच्या कामाला नवी दिशा मिळेल. संशोधनात तुम्हाला मदत मिळेल. विद्यार्थी वर्गाला ध्येयपूर्तीर्साठी प्रयत्न करता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.शुभ दि. २,४
कुंभ:
या सप्ताहात मकर राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरू प्रतियुती होत आहे. महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात वाढ होईल. समाजकार्यात यश मिळेल. गरज असलेली व्यक्ती तुम्हाला भेटेल. नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात, आनंदात कराल. राजकीय, सामाजिक कार्यात गुप्त शत्रू कुरापती वाढण्याचा प्रयत्न करतील. लोकप्रियता टिकवून ठेवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. घरातल्या माणसांना खूश ठेवता येईल. मौल्यवान खरेदी कराल. कोर्टाच्या कामात बोलण्यात चातुर्य पाहिजे. नम्रता ठेवा. साहित्याला नवा विषय मिळेल. मदत नाकारू नका. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. अभ्यास करावा. शुभ दि. ३, ५
मीन:
या सप्ताहात मकर राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु प्रति युती होत आहे. मनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यात तुमचा अंदाज बरोबर येईल. नवीन ओळख होईल. स्पर्धा जिंकाल. मागील राहिलेली कामे राजकीय-सामाजिक क्षेत्रात पूर्ण करता येतील. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, घरातील सदस्य यांच्यासोबत नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात, आनंदात कराल. आर्थिक मदत तुमच्या कामासाठी मिळेल. धंद्यात वाढ होईल. फायदा वाढेल. घरातील समस्या कमी होतील. मनाची उभारी कला-क्रीडा क्षेत्रात वाढेल. कोर्ट केस संपवता येईल. संशोधनाच्या कामात तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. विद्यार्थी वर्गाने मन स्थिर ठेवावे. अभ्यास करावा. शुभ दि. ४, ६
हे पण वाचा
- अमळनेर तालुक्यात कारमधील तरुणांनी दुचाकीला कट मारल्यानंतर झालेल्या वादात तरुणाच्या केला खून;तिन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासातच केली अटक.
- “गुलाबराव पाटील यांची माणुसकीची झलक : अपघातग्रस्त माजी उपसरपंचांची रुग्णालयात भेट”
- जनतेचा असलेला प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ – गुलाबराव पाटील
- भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेची साथ