नातेवाईकासोबत प्रेमसंबंध नवरा ठरत होता अडसर,नवऱ्याला दिलं जेवणातून विष बायको पळाली प्रियकरा सोबत पुढे काय?घडल वाचा

Spread the love

भरतपूर (राजस्थान) :- येथे एका महिलेने पतीला विष देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर ती मुलांसह प्रियकरासोबत पळून गेली. यामध्ये महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे, पण मृत्यूपूर्वी त्याने व्हिडीओ बनवला आणि संपूर्ण घटना सांगितली. हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार गुरुवारी घडला.

भरतपूरच्या बयाना पोलीस स्टेशन हद्दीतील सिकंदरा गावात राहणारा 35 वर्षीय भाग सिंह पत्नी आणि तीन मुलांसह नादबाई शहरात राहत होता. भाग सिंह हा मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. भाग सिंह याची पत्नी आरती देवी हिचे शेजारी राहणाऱ्या एका नातेवाईकासोबत प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब भाग सिंहला समजताच दोघांमध्ये भांडण सुरू झालं.भाग सिंहची प्रकृती खालावल्याने त्यांना नादबाई येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले,

तेथून डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात रेफर केले, मात्र रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले जात असताना त्याने त्याच्या विधानाचा एक व्हिडीओ बनवला, जो आता खूप व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भाग सिंह याने माझ्या पत्नीचे एका पुरुषासोबत संबंध असल्याचं म्हटलं आहे. माझ्या पत्नीने मला मारहाण केली आणि जेवणात विष दिलं. ती तिच्या प्रियकरासह पळून गेली असल्याचं सांगितलं.

हा व्हिडीओ भाग सिंह याच्या मृत्यूच्या काही तास आधीचा आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. भाग सिंह याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला तीन मुलं आहेत. भाग सिंह ज्या भाड्याच्या घरात राहत होते, त्या घरात नातेवाईक येत होता, ज्याच्यासोबत भाग सिंह यांच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते, असा आरोप आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याआधारे तपास सुरू आहे.

टीम झुंजार