बुलंदशहर :- एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरदेवाने हुंड्यामध्ये क्रेटा कारऐवजी स्विफ्ट कार मिळाल्यानं लग्नाला नकार दिला. त्यामुळे नवरीचे नातेवाईक चांगलेच संतापले. त्यांनी नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाडालाच बंदी बनवलं. त्यानंतर आतापर्यंत लग्नाला जेवढा खर्च झाला आहे. तेवढा दोन्ही पक्षांनी सम प्रमाणात देण्याचं ठरलं आणि नवरीशिवाय वरात आपल्या घरी परतली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाझियाबादमधील भोजपूर गावातून एक वरात बुलंदशहरमध्ये आली होती. दुपारी तीन वाजता लग्नाचा मुहूर्त ठरला होता. लग्नासाठी मौलवीदेखील कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. त्यानंतर वधूच्या घरच्यांनी हुंड्याची यादी वाचण्यास सुरुवात केली. या यादीमध्ये जेव्हा कारचं नाव स्विफ्ट आलं तेव्हा नवरदेवाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
हुंड्यामध्ये आपल्याला क्रेटा कार मिळावी अशी वराची इच्छा होती. मात्र स्विफ्ट कार मिळाल्यानं त्याने लग्नला नकार दिला. हुंड्यामध्ये क्रेटा कार देण्याचं ठरलं होतं मग स्विफ्ट कार का दिली असं या नवरदेवाचं म्हणणं होतं. त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. तेव्हा वधू पक्षानं देखील आपली बाजू समजून सांगण्याच प्रयत्न केला. मात्र तरीही नवरदेव ऐकण्यास तयार नसल्यानं संतप्त झालेल्या नवरीच्या नातेवाईंकांनी संपूर्ण वऱ्हाडालाच बंदी बनवलं
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






