Viral Video: हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिममध्ये व्यायाम करताना, चालता बोलता हृदयविकाराचा झटका आला अन् मृत्यू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असतील.सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात लगीनघाई सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.
हल्ली हार्ट अटॅकचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कधी जीममध्ये व्यायाम करताना, कधी खाता- पिताना, डान्स करताना सहज चालता बोलता हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना ऐकायला मिळत आहेत. पाकिस्तानमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.एकीकडे घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरदेवाला हार्ट अटॅक आला अन् काही क्षणात त्याचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हा व्हिडिओ सियालकोटच्या डस्का भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू-वर सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला कुटुंबीयही बसलेय. घरात आनंदी वातावरण आहे आणि सर्वजण हसत-हसत आहेत. अचानक सोफ्यावर बसलेला नवरदेव खाली कोसळतो. सुरुवातीला घरच्यांना काहीच समजत नाही.
मग एकजण त्याला उचलून त्याची तपासणीही करतो. मात्र अवघ्या काही क्षणात त्याचा मृत्यू होतो. याबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने वराचा जागीच मृत्यू झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. याबाबत कुटुंबीयांनी कोणतीही चौकशी किंवा तक्रार करण्यास नकार दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.