एक वर्षापूर्वी पतीचे निधन,दोन मुलासह एकटी राहू लागली विधवा ,एका तरुणाच्या तिच्याशी लग्नाच्या लावला तगादा तिने नकार देताच केली हत्या.

Spread the love

आरोपीस न्यायालयाने दिली जन्मठेपची शिक्षा,दोन्ही मुले झाली आई वडिलांन पासून पोरकी.

अकोला :- विधवा महिलेला लग्नासाठी तगादा लावत महिलेला सतत त्रास देणाऱ्या आरोपीने महिलेची हत्या केल्यामुळे त्याला विद्यमान तिसरे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील एम. पाटील यांनी खूनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्याचे आरोपीचे नाव धनराज प्रल्हाद साठे (रा. धोतरा शिंदे, ता. मूर्तिजापूर) आहे.

घटनेची हकीकत अशी की, मृतक सविता अंकुश दुधे हिचे पती घटनेच्या एक वर्षापूर्वी अपघातात मरण पावले होते. मृतक महिला तिच्या दोन लहान मुलांसोबत राहत होती. त्याच गावात राहणारा आरोपी धनराज साठे हा तिला लग्न करण्यासाठी नेहमी तगादा लावत होता. मृतक ही त्याला लग्नाकरिता नकार देत होती. त्यामुळे त्यांच्यात बरेचदा वाद होत होते. १८ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी फिर्यादी किशोर तुळशीराम दुधे याच्या ऑटामध्ये मृतक सविता तिचे दोन लहान मुलं, आरोपी धनराज साठे व इतर ५ प्रवाशी यांना घेवून मूर्तिजापूर येथून धोतरा शिंदे गावाला जाण्याकरिता निघाले होते.

धोतरा शिंदे फाट्या जवळ पोहोचताच आरोपीने त्याच्या जवळील चाकू काढून ऑटोमध्येच मृतक हिचे केस धरुन मानेवर, तोंडावर वार करुन तिचा खून केला होता. त्यामुळे या प्रकरणी पोलिस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण येथे आरोपीविरुध्द भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप मडावी यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध करण्यासाठी एकूण नऊ साक्षीदार तपासले. बचावपक्षा तर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले.

सरकार पक्षाचे पुरावे ग्राह्य मानून दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील आनंद गोदे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

प्रत्यक्षदर्शीचे बयान ठरले महत्वाचे

वरिल प्रकरणामध्ये मृतक महिलेचा मुलगा आदर्श (वय ११) हा घटनेच्या वेळी उपस्थित होता. तो हत्येचा प्रत्यदर्शी साक्षिदार असल्याने महत्वपूर्ण ठरला. सरकारी पंच, डॉक्टर व तपास अधिकारी यांचे व्यतिरिक्त इतर साक्षिदार सरकार पक्षास फितूर झाले.

हे पण वाचा

टीम झुंजार