नागपूर :- महिलेच्या आर्थिक बाजू कमकुवत असल्याचा फायदा घेऊन ३ भावंडांनी एका महिलेवर सलग ३६ दिवस बलात्कार केल्याची घटना गुजरात मध्ये घडली आहे .या बाबत सविस्तर माहिती अशी कि सदरील पीडित महिला हि आपल्या पती व २ मुलींसोबत यशोधरा नगर येथे राहत होती. घरची परस्थिती बिकटच. बिकट परस्थिती व गरिबीमुळे पतीने मुंबई येथे कामाला जाण्याचा निर्णय घेतला. याचाच फायदा शेजारील २ महिलांनी घेतला. पती बाहेर असल्याचा फायदा घेवून नंदा पैनीकर आणि मंगला वरकडे यांनी पीडितेशी सलगी केली. तिला वेळोवेळी छोटी मोठी मदत करत राहिल्या. त्या मुळे पीडीतेचे आणि त्या २ महिलांचे चांगले संबंध जूळले . याचाच फायदा त्या दोन महिलांनी घेतला.
त्या महिलांनी पीडीतेला गुजरातमध्ये दर महिन्याला २० हजार पगार असलेली एका श्रीमंत घरातील मुलं संभाळण्याचं काम आहे. अशी खोटी माहिती दिली. त्यामुळे दिप्तीने आपल्या दोन मुलींना सोबत गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पीडीतेने आपल्या पतीचा पण होकार घेतला. नंदा आणि मंगला यांनी पीडीतेला तिच्या दोन्ही मुलींसोबत नागपूर रेल्वे स्थानकावर नेले. त्यांच्या सोबत १७ वर्षाच्या २ अन्य मुली होत्या. त्यांनाही गुजरात मध्ये कामाला लावण्याचं आमिष दाखवण्यात आलं होते. पीडीतेला गुजरात मध्ये गेल्यानंतर संतोष नामक व्यक्तीची ओळख करून देण्यात आली. मात्र तिथे गेल्यानंतर पीडीतेच्या दोन्ही मुलींना हिसकावून घेण्यात आले तिला धमकी देऊन तिच्या गळ्यात हार घालून लग्न लावण्याचा बनाव करण्यात आला.

त्यानंतर संतोष ने पीडीतेला आपल्या घरी नेले आणि दीप्ती ही आपली पत्नी असल्याचे घरच्यांना सांगितले. पण त्याच रात्रीपासून संतोष आणि त्याचे दोन भाऊ गोलू व प्रतीक यांनी सामूहिक बलात्कार करायला सुरुवात केली सलग ३६ तास हे तिन्ही भावंडं पीडीतेवर बलात्कार करत राहिले. दिप्तीने याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला असता तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. शेवटी या तिन्ही भावंडाच्या अत्याचाराला कंटाळून शेजारील महिलेच्या मदतीने पळ काढला.
त्यानंतर तिने थेट नागपूर गाठले. पीडीतेने थेट नागपूर पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि तिने त्यांना घडलेला सगळं घटनाक्रम सांगितला.आयुक्तांनी हे प्रकरण रेखा संकपाळ यांच्याकडे सोपवलं. त्यांनी पीडीतेकडून सर्व घटनाक्रमांचे माहिती घेऊन नंदा पैनीकर, मंगला वारकडे यांच्यासह संतोष,गोलू आणि प्रतीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्याची कारवाही सुरु आहे.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.