धरणगाव :- तालुक्यातील वराड बु. गावातील बसस्थानकासमोर वाहनाला वाचविण्याचा प्रयत्नात पेट्रोल टँकरच्या अपघातात चालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.धरणगाव पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक येथे लक्ष्मण माणिक वाडले (वय ५२) पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. टँकरचालक म्हणून ते काम करत होते.
शनिवारी वराड बुद्रुक गावातील बसस्थानकासमोरून ते जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर थेट नाल्यावरील पुलावरील कठड्यावर धडकला. अपघातात चालक लक्ष्मण वाडले गंभीररीत्या जखमी झाले. अपघात होताच ग्रामस्थांनी लक्ष्मण वाडले यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. ग्रामस्थ व नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. लक्ष्मण वाडले यांच्या मागे पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी, आई आणि भाऊ असा परिवार आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.