Viral Video: सध्या तरुणाईला रिल्स काढण्याचे, व्हिडिओ बनवण्याचे प्रचंड वेड लागलयं. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, फेमस होण्यासाठी तरुण- तरुणी अनेक स्टंट करत असतात. अशा स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.सध्या अशाच एका तरुणीच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी नवनव्या आयडिया शोधून रिल्स बनवले जातात. अशा अतरंगी रिल्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल असतात.
कधी जबरदस्त डान्स, कधी मेट्रोत, रेल्वे स्टेशनवर तुफान मारामारी, तर कधी खतरनाक स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहायला नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. मात्र सध्या एका तरुणीच्या व्हिडिओने क्रिएटीव्हीटीची हद्दच केली आहे.कडाक्याच्या थंडीत दुचाकीवर उलटी बसून या तरुणीने अशी काही कृती केली की सर्व जण चक्रावून गेले. तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. ना हेल्मेट, ना गाडीला नंबर प्लेट.. अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करण्याची मागणी काही जणांनी केली आहे.
व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, स्टंटबाजी करण्यासाठी एक तरुणी दुचाकीवर उलटी बसून प्रवास करत आहे. इतकेच नव्हेतर रस्त्यावर येणाऱ्या इतर वाहन चालकांना ती फ्लाईंग किसही देताना दिसत आहे. एका बाईकस्वाराने इशारे करून तरुणीला त्याच्या दुचाकीवर बसण्यासही सांगितले. पण तरुणी त्याला नकार देते.ज्या गाडीवर ही तरुणी बसली आहे, त्या गाडीला नंबर प्लेट नाही, दोघांनीही हेल्मेटही घातले नाही. अशा अवस्थेत चाललेली ही हुल्लडबाजी पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने या दोघांवर कडक कारवाई करावी.. अशी मागणी काही जणांनी केली आहे. तसेच अशा प्रकारामुळे अपघात होण्याचीही भिती काही जणांनी व्यक्त केली आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.