हिटअँड रन! तीन नव्या कायद्यांविरोधात ट्रक चालकांनी पुकारलेला संप मागे;दिल्लीतून आली दिलासादायक बातमी

Spread the love

नवी दिल्ली :- तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात संपावर गेलेल्या वाहतूकदारांचा केंद्र सरकारशी अखेर समेट झाली आहे. नवीन कायद्यातील हिट अँड रनसाठी कठोर शिक्षेला वाहनचालक आणि वाहतूकदार विरोध करत आहेत. आज सायंकाळी केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर सध्या त्यांची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह सचिव अजय भल्ला यांनी सांगितले की, हिट अँड रनचे नियम अद्याप लागू होणार नाहीत. वाहनचालकांना कामावर परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 10 वर्षे कारावास आणि दंडाचा नियम अद्याप लागू होणार नाही.

काय आहे नवीन कायदा?भारतीय न्यायिक संहितेत हिट अँड रन हा कायदा बनला आहे. आगामी काळात, त्याच्या नवीन तरतुदी भारतीय दंड संहितेच्या (IPC) जुन्या तरतुदींची जागा घेतील. मात्र यावरुन आता गदारोळ सुरू सुरू झाला आहे. नवीन तरतुदीनुसार, रस्ता अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास आणि वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि दंडही भरावा लागणार आहे.

यापूर्वी 2 वर्षांची शिक्षा होती

वास्तविक, रस्ते अपघात आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने दरवर्षी सुमारे 50 हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे सरकारने हिट अँड रन कायदा अधिक कडक केला आहे. हिट अँड रन प्रकरणात यापूर्वी दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद होती आणि जामीनही सहज मिळत होता. या कठोर तरतुदी त्याच्या विरोधाचे कारण ठरत आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळीच उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात, असा सरकारचा विश्वास आहे.

कोण करतंय विरोध?
देशभरातील अनेक राज्यांमध्ये याविरोधात ट्रकचालक आंदोलन करत आहेत. केवळ ट्रकचालकच नाही तर बस, टॅक्सी, ऑटोचालकही याला विरोध करत आहेत. कारण नवीन कायदे खाजगी वाहन चालकांनाही तितकेच लागू होणार आहेत. विरोधकांचे मत आहे की या तरतुदी खूप कडक आहेत आणि त्या शिथिल करणे आवश्यक आहे. घटनास्थळावरुन पळून गेल्यास कठोर शिक्षा भोगावी लागेल, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे अपघातानंतर तो थांबला तर त्याच्या जीवाला धोका आहे. कारण अशा परिस्थितीत घटनास्थळी उपस्थित असलेले लोक किंवा जमाव हिंसक होऊ शकतो. अशा स्थितीत चालकाचाच जीव धोक्यात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार