१२ संशयित आरोपींना अटक, २० जण फरार
एरंडोल :- विखरण (ता.एरंडोल) येथे कांद्याच्या गोण्यांवरून दोन गटात झालेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्यामुळे सहाय्यक
निरीक्षकांसह पोलीस पाटील जखमी झाले.यावेळी एका गटाच्या युवकांनी पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलांना देखील मारहाण करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.याबाबत पोलीस स्थानकात परस्परांविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दहा संशयितांना अटक केली असून २२ जण फरार झाले आहेत. गावात तणावपूर्ण शांतता असून शिघ्र कृती दलासह पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.पोलिसांवर हल्ला करून दहशत निर्माण करणा-या समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान विखरण येथे चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदनवाळ यांनीघटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती जाणून घेतली याबाबत विखरण येथील सागर उर्फ पवन चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,की ते समाधान माळी यांचेसोबत चोरटक्की शिवारातील सलीम शेख यांचेसह रविवारी सकाळी नऊ वाजेस कांद्याच्या गोण्या भरण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कांद्याच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकसह विखरण येथे येत असतांना रस्त्यावर ट्रकमधून कांद्याच्या सहा ते सात गोण्या खाली पडल्या.सागर चौधरी यांनी चालकास सांगून ट्रक थांबवली आणि गोण्या घेण्यासाठी खाली उतरले असता त्यांना चोरटक्की येथील भिल समाजाचे सात ते आठ युवक गोण्या नेत असल्याचे दिसले.सागर चौधरी यांनी गोण्या नेण्यास विरोध केल्याने त्यास मारहाण केली.

सागर चौधरी हे गावात आल्यावर झालेल्या मारहाणीची माहिती ग्रामस्थांना दिली.गावातील तुकाराम महाजन, समाधान माळी,भूषण महाजन,कैलास महाजन,योगेश महाजन व लोटन चौधरी यांचेसह सागर चौधरी हे कांद्याच्या गोण्या घेण्यासाठी गेले असता त्यांना युवकांनी शिवीगाळ करून धमकी दिल्यामुळे ते परत आले. सोमवारी (१जानेवारी)ला सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतजवळ चोरटक्की येथील गोविंदा पवार,एकनाथ भिल्ल,गोकुळ भिल,जितेंद्र मालचे,जितेंद्र भिल,रतन भिल,राजू भिल, रवींद्र ठाकरे, अनिल ठाकरे, भूषण पवार,गोलू पवार, कमलेश इंगळे, वसंत मोरे यांचेसह दहा ते अज्ञात व्यक्ती लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड घेवून आले. पोलीसपाटील विनायक पाटील यांनी त्याना हटकले असता युवकांनी त्यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि मला मारण्यासाठी जमाव धाऊन आला.

त्याचवेळी गावात पोलीस गाडी आल्यामुळे पोलिसांनी सागर चौधरी यांना पोलीस गाडीत बसवले असता जमावाने पोलीस गाडीवर हल्ला करून गाडीची तोडफोड केली.तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांचेसोबत असलेल्या पोलीस कर्मचा-यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.युवकांच्या मारहाणीत सहाय्यक निरीक्षक जखमी झाले.याबाबत सागर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच चोरटक्की येथील नाना बाबुराव बागडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,की रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ट्रकमधून सहा ते सात गोण्या पडल्यामुळे माझा मुलगा गणेश आणि वस्तीतील काही युवक गोण्या उचलण्यासाठी गेले.त्याचवेळी काही अंतरावर ट्रक थांबली आणि त्यामधून सागर चौधरी खाली उतरला आणि कांद्याच्या गोण्या उचलू नका असे सांगून शिवीगाळ करू लागला.

त्यावेळी सागर चौधरी आणि त्याचेसोबत ट्रकमध्ये युवकांसोबत भिल समाजातील युवकांचे वाद झाले. त्यानंतर कांद्याचे व्यापारी सलीम खाटीक हे चोरटक्की येथे आले आणि कांद्याच्या गोण्या परत देण्याचे सांगितल्यावर मी घरातील एक गोनी दिली आणि उद्या सकाळी उर्वरित गोण्या देतो असे सांगितले.व्यापारी खाटिक त्या ठिकाणाहून निघून गेले.रात्री साडेसात
वाजेच्या सुमारास नाना बागडे हे परिवारासह जेवण करीत असतांना सागर चौधरी हे तुका महाजन,समाधान माळी,भूषण महाजन,कैलास महाजन,योगेश महाजन, लोटन चौधरी यांचेसह

तीन ते चार अनोळखी व्यक्ती आले आणि सागरला का मारले असे विचारून मारहाण करू लागले.तसेच जातीयवादी शिवीगाळ करून त्यांनी केलेल्या मारहाणीत डाव्या हाताला व खांद्याला मार लागला आहे.मला मारहाण केल्यानंतर सर्व जण मागील गल्लीत राहणारे किसन पवार यांचे घरी गेले आणि पवार यांचेसह त्यांची पत्नी संगिता पवार,वैशाली ठाकरे,हिम्मत पवार यांना देखील शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ केली.याबाबत नाना बागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयितांविरोधात गुणा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विखरण येथील पोलीसपाटील विनायक पाटील यांनी मोबाईलवर काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गावात माळी समाजातील युवक आणि भिल्ल समाजातील युवक यांचेत कांद्याच्या गोण्यांवरून वाद झाले असून आज पुन्हा वाड होण्याची शक्यता आहे.पोलीसपाटील विनायक पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून मी अकिल मुजावर,रवींद्र तायडे या कर्मचा-यांसह शासकीय वाहनाने विखरण येथे गेलो.विखरण येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ भिल्ल समाजाचे पन्नास ते सत्तर युवक लाकडी दांडके आणि लोखंडी पाईप घेवून उभे असल्याचे दिसून आले.

निरीक्षक गणेश अहिरे यांनी सर्व उपस्थितांची व्हीडीओ शुटींग घेतली आणि पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना एरंडोल येथून पोलीस बंदोबस्त घेवून येण्याचे सांगितले.ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जमलेल्या भिल्ल समाजातील युवकांना नाना बागडे यांनी दिलेली तक्रार नोंद करण्यात आली असून संशयित सागर चौधरी यास ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजाऊन सांगितले. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.त्याचवेळी जमावातील एकाने पोलीसपाटील विनायक पाटील यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

निरीक्षक अहिरे यांनी पोलिसपाटील विनायक पाटील यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता जमावातील एकाने निरीक्षक अहिरे यांना देखील मारहाण करून जखमी केले.त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनात असलेल्या सागर चौधरी यास मारहाण करण्यासाठी पोलीस गाडीवर हल्ला करून गाडीच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केले.त्यानंतर उपनिरीक्षक शरद बागल हे पोलीस कर्मचा-यांसह विखरण येथे आल्यानंतर जमावाला पांगवण्यात आले.याबाबत सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोविंदा पवार,एकनाथ भिल,गोकुळ भिल,जितेंद्र मालचे,जितेंद्र भिल,रतन भिल,राजू भिल,रवींद्र पवार,शंकर पवार, मधुकर पवार,गणेश सोनवणे,राजेंद्र ठाकरे,अनिल ठाकरे,भूषण पवार,गोलू पवार,कमलेश इंगळे,वसंत मोरे
यांचेसह अन्य दहा ते पंधरा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोन्ही गटातील बारा जणांना अटक केली असून २० जन फरार झाले आहेत.दरम्यान विखरण येथे दोन गटातील वादात सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,पोलीसपाटील विनायक पाटील यांचेवर जमावाने हल्ला केल्याचे समजताच पारोळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार,धरणगावचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे,कासोदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी विखरण येथे दाखल झाले.सद्यस्थितीत
विखरण येथे तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.