Viral Video:मेट्रोमध्ये धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणांवरुन महिलांमध्ये एकमेकींचे केस ओढत दे दणादण फ्रीस्टाईल हाणामारी पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: दिल्ली मेट्रो सध्या विविध कारणांनी चांगलीच चर्चेत असते. कधी कपलच्या विचित्र गोष्टीमुळे तर कधी चोरीच्या घटनांमुळे दिल्ली मेट्रो वादात सापडली होती. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. मात्र हे प्रकार काही थांबता थांबेनात.पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात महिलांची चागंलीच हाणामारी जुपंली आहे. यात चक्क क्षुल्लक कारणांवरुन महिला एकमेकींचे केस ओढून देखील हाणामारी करत आहे. हा हाय होल्टेज ड्रामा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिल्ली मेट्रोतील महिलेचा डब्बा आहे. यात महिलांची तूफान गर्दी दिसत आहे. काही कारणावरुन दरवाजाच्याजवळ असलेली आणि तिच्या समोरील महिलेमध्ये काही कारणास्तव बाचाबाची सुरू असते. मात्र यांच्या बोलण्याचे रुपांतर काही वेळा नंतर हातापायीवर येते तसेत दोघी एकमेकींच्या कॉलर धरतात.

त्यातील एक दुसरीला कानाखाली मारते त्यामुळे दुसरीही तिला मारण्यास सुरुवात करते. शेवटी दोघींही एकमेंकीचे केस ओढण्यापर्यंत जातात. मेट्रोमधील असलेल्या सह प्रवाशी काही महिला यांना थांबण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही महिला लांबूनच यांची मज्जा बघत आहेत तसेच काही आपल्या मोबाईलमध्ये यांची हाणामारी कैद करत आहेत.

नेमकं कारण काय?

महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या एक्स अॅपवरील @GharKeKalesh अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमधून या हाणामारीचे कारण समजण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, एका महिलेला मेट्रोमध्ये प्रवास करताना धक्का लागला त्यामुळे ही जोरदार हाणामारी झाली आहे. घर का कलेश या अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने व्हिडिओतील ड्रामा पाहून लिहिलं आहे की,’ स्त्रियांच्या भांडणात… केस ओढणे हे कायमचं आहे’ तर आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, ‘ यांच्या भांडण्यातीस या व्हिडिओला काही पार्श्वसंगीत लावा’. हजारोंच्या घरात व्हिडिओ लाईक्स मिळाले असून त्याच प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत

हे पण वाचा

टीम झुंजार