5 कोटी रुपयांची जमिनीच्या वादातून पत्नीने पती व दिरा जेठवर झाडल्या गोळ्या.दोघांची केली हत्या.
उज्जैन : प्रॉपर्टीवरून चालू असलेल्या वादात एका महिलेने पती आणि दीर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पिस्तूल घेऊन थेट पोलिस स्टेशनला हजर झाली. ‘गोळ्या घालून आले आहे, डेड बॉडीज ताब्यात घ्या,’ असं सांगून तिने पिस्तूल पोलिसांसमोर ठेवलं आणि खुर्चीवरचा पोलिसही गडबडून गेला! एखाद्या क्राइम थ्रिलरमधली वाटत असली तरी ही प्रत्यक्ष आयुष्यातली घटना आहे आणि मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये घडली आहे.उज्जैन पोलीस मुख्यालयापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या इंगोरिया गावात ही घटना घडली आहे. पती आणि दीर यांना गोळ्या घालणारी महिला 35 वर्षांची असून, तिचं नाव सरिता असं आहे. सरिता ही एक अंगणवाडी सेविका असल्याची माहितीही समोर येत आहे.
सरिताने आपला 41 वर्षीय पती राधेश्याम आणि 47 वर्षीय जेठ दिनेश यांना गोळ्या घातल्या आणि त्यांचे मृत्यू झाल्यावर पिस्तूल घेऊन स्वतःच पोलिस स्टेशनला जाऊन घडलेल्या प्रसंगाची माहितीही दिली. इंगोरिया पोलीस स्टेशनच्या प्रभारी चंद्रिका सिंह यादव म्हणाल्या, सरिताचा पती राधेश्यामचा जागीच मृत्यू झाला. जेठ दिनेश याच्यावर बडनगरमध्ये रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सरिता पिस्तूल घेऊन पोलिस स्टेशनला आली. तिचा अवतार बघून पोलिस स्टेशनमध्ये हजर असलेले कर्मचारीही अचंबित झाले. फोर लेन हायवेच्या लगत असलेली सुमारे पाच कोटी रुपये किमतीची जमीन हडपण्याचा जेठ दिनेश याचा डाव होता. त्यामुळे तो सतत नवऱ्याला दारू पाजत असे. दारूच्या नशेत नवरा तिला मारझोड करत असे. सोमवारी सकाळीच नवऱ्याने शिवीगाळ सुरू करताच संतापलेल्या सरिताने आधी नवऱ्यावर आणि नंतर जेठवर गोळी झाडली. संपत्तीच्या वादातून आपल्या दोन मुली आणि एक मुलगा यांना काहीच हाती लागणार नाही अशी सरिताला भिती होती.
त्यावर उपाय म्हणून आपण या प्रकरणात असा निकाल लावला, असा दावा सरिताने केला आहे. राधेश्याम आणि दिनेश यांच्या नातेवाईकांनी मात्र या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. संपत्तीच्या वाटण्या पूर्वीच झाल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा त्यावरून वाद होण्याचा विषयच येत नाही असं त्यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. घरात पिस्तूल कुठून आलं अशी शंकाही कुटुंबीयांनी उपस्थित केली आहे. ॲडिशनल एसपी नितीश भार्गव म्हणाले, महिलेने संपत्तीच्या वादातून हे केल्याचं स्पष्ट आहे. आमची टीम अधिक तपास करत असून, त्याबाबत माहिती वेळोवेळी दिली जाईल.
५ कोटी जमीन वाद
या प्रकरणी आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, फोरलेन हायवेवरील ५ कोटी किंमतीची जमीन जेठला हडपायची होती. माझा पती राधेश्याम व्यसन करायचा. दिराच्या सांगण्यावरून पती दररोज मला मारहाण करायचा. सोमवारी सकाळी पती शिवीगाळ करत होता. त्या रागात मी बेडखालची पिस्तुल काढली आणि आधी दिराला गोळ्या झाडल्या त्यानंतर पतीलाही मारून टाकले. रोजच्या मारहाणीमुळे आणि हिंसेमुळे हे पाऊल उचलल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्याशिवाय माझ्या २ मुली आणि एका मुलाच्या भविष्यासाठी मी या दोघांना मारले असंही महिला पोलिसांना म्हणाली.
बंदूक कुठून आणली?
अनेकांनी या हत्याकांडावर प्रश्न उभे केले. मृत व्यक्तीचे वडील आणि आरोपी महिलेच्या सासऱ्यांनी म्हटलं की, दिनेश आणि राधेश्याम या दोन्ही भावांमध्ये जमिनीचे वाटप आधीपासून होते मग वाद कशामुळे झाला? अखेर घरात बंदूक कुणी आणली? या सर्व गोष्टीची शहानिशा करून आरोपी सूनेला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तर घरगुती आणि संपत्तीच्या वादातून महिलेने रागाच्या भरात हे कृत्य केले. त्यानतर महिलेने पोलीस स्टेशनला येऊन शरणागती पत्करली. परंतु पोलीस या घटनेत आणखी तपास करत असून सर्व अँगलचा शोध घेत आहेत.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.