CCTV Video: हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला आणि जीव गेला. अभिनेता श्रेयस तळपदेलाही काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहेत. याच दरम्यान मध्यप्रदेशातून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये एका पेंटरचा रंगाकाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आहे.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडीओतून सकाळी घराबाहेर गेलेला व्यक्ती पु्न्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @KashifKakvi नावाच्या युजरने शेअर केला आहे. युजर्सच्या म्हणण्यानुसार, इंदूरचा पेंटर आशिष काम करताना नर्व्हस वाटत होता. तो उठला, लगेच पाणी पिऊन तोंड धुवून परतला. त्यानंतर अचानक छातीत दुखू लागले. तो पेंटच्या डब्यावर बसला पण एका मिनिटात तो पडला. त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते.
लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. युजरने पुढे लिहिले की, सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी जिवंत घरी परत येईल असा दावा कोणीही करू शकत नाही. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत. इंदूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान इंदूर शहरात हृदयविकाराच्या झटक्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.