प्रतिनिधी l पारोळा
येथील मोठे श्री राम मंदिरात अयोध्यातील अभिमंत्रित १०६ अक्षदा कलशाचे शहरासह ग्रामीण भागातील राम भक्तांना वितरण करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीरामचंद्र की जय..या सारख्या हिंदुत्ववादी घोषणेच्या निनादातून हिंदू अस्मितेचा श्वास प्रभू श्रीराम भक्तीचा जागर करण्यात आला. हिंदू अस्मितेचा श्वास प्रभू श्रीराम यांचे अयोध्येत मंदिर व्हावे, अशी ज्वाजल्य इच्छा करोडो हिंदू बांधवांची होती. यासाठी ५०० वर्ष संघर्ष करावा लागला. या मोठ्या संघर्ष आणि भगीरथ प्रयत्नांतर भव्य श्री राम मंदिर उभारले जात आहे. परिणामी श्री राम हिंदू बांधव आणि श्री राम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
गर्भगृहात २२ जानेवारीला प्रभू श्री राम यांची प्रतिष्ठापना होत आहे. त्या पुष्टभुमीवर पारोळा तालुक्यातील १०० गावांत तसेच शहरातील ६ वस्तीश: अभिमंत्रित अक्षदा कलश, निमंत्रण पत्रकाचे वितरण करण्यात आले.
यावेळी गोपाल अग्रवाल, ऍड अतुल मोरे, धीरज महाजन, सचिन गुजराथी, रवींद्र पाटील, गोपाल दानेज, भावडू राजपूत, जितेंद्र पाटील, नरेंद्र साळी, आकाश बडगुजर, श्रीकांत पाठक, देविदास वाणी, लक्ष्मण महाले, राहुल निकम, ज्ञानेश्वर बुंधे यांच्यासह भक्तगण स्वयंसवेक उपस्थित होते.
—शोभायात्रेने वेधले लक्ष
अयोध्यातून अभिमंत्रित होवून आलेल्या अक्षदा कलशाची श्री राम मंदिर ते श्री बालाजी मंदिर अशी शोभा यात्रा काढण्यात आली.१०६ कलशधारी महिला, कलश दर्शनासाठी आलेले हिंदू बांधव रामभक्त या यात्रेत सहभागी झाले. डीजेच्या माध्यमातून प्रभू श्रीरामावरील गीताने परिसर भक्तिमय वातावरण निर्माण होऊन भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. दरम्यान माजी खा. ए. टी. पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुरेंद्र बोहरा, डाँ. संभाजीराजे पाटील, प्रवीण दानेज यांनी दर्शन घेत शोभायात्रेत सहभागी झाले.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.