पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपाची चोरी करून वाहनातून घेवून जाताना चाळीसगाव शहर पोलीसांनी 5 जणांना घेतले ताब्यात.

Spread the love

चाळीसगाव :- शहर पोलीस स्टेशन कडून सन 2024 हे चाळीसगाव शहर सुरक्षित शहर या संकल्पनेखाली काम सुरु करण्यात आले असुन, सदर संकल्पनेचे आधारे चाळीसगावचे नागरिकांमध्ये सुरक्षेकामी जनजागृती करण्यात येत आहे. त्याच बरोबर चाळीसगाव शहर पोलीसाकडून मोक्याच्या ठिकाणी बँका, सराफ बाजार, मुख्य मार्केट, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन परिसरात गस्त करुन संशयीत इसमावर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच नागरिकांना जास्तीत जास्त सी.सी.टी.व्हि. कॅमेरे घराचे बाजुला आणि परिसरात लावणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

त्यात सुध्दा नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. चाळीसगांव शहरात रात्रौ रिक्षा चालकांना सुध्दा कोणी संशयीत इसम प्रवासी म्हणून घेवून जात असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देणे कामी प्रोत्साहन देण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील दर्ग्यावर नियमीत साधेवेशात वॉच ठेवून गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची नव्याने रचना करण्यात आली असुन सदर पथकास मा. पोलीस अधिक्षक सो. श्री एम राजकुमार, मा.अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक, श्री अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली चोरीच्या गुन्हयांना आळा बसणे कामी सुचना देण्यात आलेल्या आहेत.

दिंनाक 04/01/2024 रोजी सफौ/शशीकांत महाजन, चापोना/नितीश पाटील, पोशि/संदीप पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहेकॉ/ प्रशांत पाटील, पो.ना./दिपक पाटील, पोशि/ अमोल भोसले, अजय पाटील, नंदकिशोर महाजन, मोहन सुर्यवंशी यांना पोलीस निरीक्षक, श्री संदिप पाटील यांनी रात्रौच्या वेळी गस्त दरम्यान संशयीत वाहने चेक व खात्री करुन कारवाई करणेकामी सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे सदर पथक गस्त करत असतांना पोलीस नाईक दिपक पाटील यांना रात्रौ 03.45 वाजेच्या सुमारास धुळे रोडवरील डेराबर्डी परिसरात असलेल्या साने गुरुजी शाळेसमोर रोडवर मेहुणबारे गावाकडुन चाळीसगाव शहराकडे एक टाटा एस (छोटा हत्ती) वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले.

तेव्हा सदर वाहन चालकास त्यांनी थांबविण्याचा इशारा केला, परंतु चालकाने त्याचे ताब्यातील टाटा एस ( छोटा हत्ती) वाहन न थांबविता भरधाव वेगाने चाळीसगाव शहराकडे चालवित नेले. तेव्हा पोलीस पथकाचा त्या वाहनावर अधिक संशय बळावल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग करुन, वाहनास पुन्शी पेट्रोल पंपाच्यापुढे वाहनास थांबविले. त्या वाहनामध्ये मागे तीन ईसम बसलेले होते. त्यांनी पोलीसांना पाहताच त्यापैकी दोन इसम अंधाराचा फायदा घेवुन वाहनातुन उतरुण पळुन गेले. तसेच वाहन चालक आणि त्याच्या शेजारी तीन इसम बसलेले होते. पोलीस पथकाने वाहनाची तपासणी केली असता, त्या वाहनात शहरात जल पुरवठा वाहिनीसाठी वापरण्यात येणारा, लोखंड मिश्रीत बिड धातुचा एक पाईप तसेच त्या पाईपाचे तुकडे दिसले. पोलीस पथकाने त्यांना सदर पाईप कोठुन आणला बाबत व पळुन गेलेल्या इसमांबाबत विचारपुस केली असता ते उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागले.

तेव्हा सदर पथकातील कर्मचारी यांना सदर पाईप हा कोठूनतरी चोरी करून आणले असल्याचे खात्री झाल्याने सदर इसमांना वाहनासह ताब्यात घेवून, पोलीस स्टेशनला हजर करून, त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा 124 भा.द.वी कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे नावे 1) अशोक विश्वनाथ पवार वय 27 वर्षे (चालक) 2) वाल्मीक साहेबराव सोनवणे वय 45 वर्षे दोन्ही रा.पाण्याच्या टाकीजवळ, डेराबर्डी, चाळीसगाव 3) राहुल रावसाहेब पाटील वय 31 वर्षे रा. भोरस खु. हनुमान मंदीराजवळ ता.चाळीसगाव, 4) रविंद्र नागो राजपुत वय 52 वर्ष रा. नवेगाव मेहुणबारे ता. चाळीसागाव अशी असून, त्यांच्या कडून जप्त करण्यात आलेला पाईप व वाहन अंदाजे 2,20,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

पळून गेलेल्या इसमांबाबत माहीती घेता त्यांनी त्याची नावे किरण म्हस्के व रोशन मोरे असे असल्याचे माहीती प्राप्त झाल्यावर, तात्काळ पोलीस पथक पळुन गेलेल्या आरोपीतांचा शोध घेण्यासाठी गेले असता इसम नामे 5) रोशन युवराज मोरे वय 23 वर्षे रा. दसेगांव ता. चाळीसगांव हा चाळीसगांव बसस्टँण्ड जवळ मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले आहे. पळून गेलेला इसम नामे किरण मस्के याचा शोध घेऊन ताब्यात घेत आहोत. सदरचा जप्त मुद्देमाल नमुद आरोपीतांनी कोठून चोरून आणला याबाबत चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोना/दिपक पाटील, पोशि/अमोल भोसले तपास करीत आहे. तरी नागरीकांना चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन मार्फत आव्हान करण्यात येत आहे की, कोणी संशयीत इसम चाळीसगांव शहरात फिरत असल्यास त्यांची माहीती तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे, जेणे करून चोरीच्या गुन्ह्यांना पायबंद घालणेकामी पोलीसांना मदत होईल

हे पण वाचा

टीम झुंजार