नवी दिल्ली येथील भाजपची लोकसभा व श्रीराम मंदिर दर्शन अभियान बैठक.

Spread the love

एरंडोल :- भाजपच्या नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात श्रीराम मंदिर दर्शन अभियान आणि लोकसभा निवडणूक या विषयावर चर्चा करण्यासाठी देशभरातील प्रमुख पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.nadda,राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,सुनील बन्सल,तरुण चुग,संघटनमंत्री बी.एल.संतोष,केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. बैठकीत २२ जानेवारी रोजी होणा-या आयोध्या येथील श्रीराम मंदिराचे उदघाटन आणि आगामी काळात होणा-या लोकसभेच्या निवडणुका या प्रमुख विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.आयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उदघाटनप्रसंगी देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यांच्या राहण्याची, भोजनाची व पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच २२ जानेवारीनंतर आयोध्यात श्रीरामाच्या दर्शनासाठी देशभरातून आणि प्रत्येक राज्यातून दररोज लाखो भाविक येणार असल्यामुळे राहण्याची आणि दर्शनाची योग्य व्यवस्था करण्याची सुचना प्रत्येक राज्यातील प्रमुख पदाधिका-यांना करण्यात आली. कारसेवकांच्या बलिदानामुळे आयोध्येत राममंदिर उभारण्यात येत असून त्याच्या उद्घाटन पाहण्याचे भाग्य आपणास सर्वांना मिळत असल्याचे भावनिक प्रतिपादन यावेळी नेत्यांनी केले.बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.naddaa,केंद्रीयमंत्री अश्विन वैष्णव यांचेसह उपस्थित प्रमुख पदाधिका-यांनी मार्गदर्शन करून नियोजनाबाबत सुचना केल्या.

तसेच लोकसभा निवडणुकीबाबत देखील उपस्थित चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.लोकसभा निवडणुकीत चारशे जागांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सामुहिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी सर्व पदाधिका-यांनी
पार पाडावी अशी सुचना करण्यात आली.बैठकीस महाराष्ट्रातून भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर,लक्ष्मणराव सावजी,राजेशजी पांडे,संजय उपाध्याय,संतोष ठाकूर,अमोल जाधव यांचेसह देशातील सर्व राज्यातील
पदाधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार