खळबळजनक! कॉफी शॉपमध्ये कॉलेजचे 9 कपल्स तरुण-तरुणी आढळले नको त्या अवस्थेत पोलिसांनी टाकला छापा.

Spread the love

जालना :- पोलिसांनी केलेल्या छापेमारीत मोठे सेक्स रॅकेट उघड झाले आहे. शहरात 3 कॉफी शॉपमध्ये नावाखाली गोरखधंदा सुरु होता. पोलिसांना कॉलेज तरुण-तरुणींना आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी कॉफी शॉप मालकांकडून छोटे कंपार्टमेंट उपलब्ध करून दिले जात होते. या कारवाईमुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जालना पोलिसांनी कुठे टाकले छापे?-

महिला व बाल रुग्णालयासमोर कदीम जालना हद्दीतील गांधीचमन परिसरातील हिडन फूड्स.- महात्मा गांधी पुतळ्यासमोर बडीज् कॉफी कॅफे.- सिंदखेडराजा रोडवरील दत्ताश्रमासमोर दी शेलेक्स कॅफे. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. हिडन, बडीज आणि दी शेलेक्स अशी तीन कॉफीशॉपवर पोलिसांनी छापे टाकले. प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले. हिडनमध्ये 4, बडीजमध्ये 2 आणि दी शेलेक्समध्ये 3 कपल्स अश्लील चाळे करताना अवस्थेत आढळून आले. सर्व तरुण- तरुणी 17 ते 21 वयोगटातील आहेत. धक्कादायक म्हणजे कॉफी शॉप मालकांकडून तरुण-तरुणी बेड असलेले छोटे कंपार्टमेंट उपलब्ध करून देण्यात आले होते.

प्रत्येक कपलकडून एका तासासाठी 1000 रुपये आकारले जात होते. पोलिसांनी कॅफे हिडन कॉफी शॉपचा मालक गजेंद्र सुनील सुपेकर (वय 28, रा. गांधी चौक), बडीजचा मालक मेघराज दत्तात्रय चव्हाण (वय 29, राय भाग्यनगर) आणि द शेलेक्सचा मालक अमोल दुर्गादास जाधव (वय 27, रा. भाग्यनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जालना शहर पोलिसांनी गेल्या महिन्यात दोन सेंटरवर धडक कारवाई केली होती. आता त्याच पद्धतीने शहरातील आणखी 3 कॉफी शॉपवर पोलिसांनी छापा टाकून गोरखधंद्याचा भंडाफोड केला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार