विशाखापट्टणम :- (आंध्रप्रदेश) तील विशाखापट्टणममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडिता विशाखापट्टणम येथे घरकाम करते. याप्रकरणी सध्या 11 जणांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.मिळालेल्या महितीनुसार, पीडिता काही महिन्यांपूर्वीच विशाखापट्टणमला राहण्यास आली होती. तेथे आल्यानंतर ती 17 डिसेंबरला विशाखापट्टणममधील आरके बीचवर फिरायला गेली होती.
यावेळी तिची तेथील फोटोग्राफर्ससोबत ओळख झाली. या फोटोग्राफर्सनी पीडितेला पळवून नेले. यानंतर तिला एका लॉजवर नेऊन तिच्यावर एक एक करून सामूहिक बलात्कार केला. या नराधमांनी 22 डिसेंबरपर्यंत पीडितेला लॉजवरच डांबून ठेवले होते. 23 डिसेंबर रोजी आरोपीने मुलीला 200 रुपये देऊन सोडून दिले. आपली मुलगी 17 डिसेंबरपासून बेपत्ता असल्यामुळे तिच्या वडिलांनी विशाखापट्टणममधील पोलीस स्टेशनला मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
यानंतर 25 डिसेंबरला पीडिता घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडली. पीडितेला घडलेल्या प्रकाराचा प्रचंड धक्का बसला होता. त्यामुळे तिने दोन दिवसांनंतर 31 डिसेंबरला आपल्यासोबत घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला असून या संदर्भातील 11 आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण
- महिला बचत गटाच्या पदाधिका-यांची मोटारसायकलस्वारांकडून साडेचार लाख रुपयांची लुट.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.